शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

कोल्हापूर : सोन्याची चेन वितळल्यानंतर निघाले तांबे, सर्वच दागिने तांबे असल्याची आरोपींची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 18:23 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकांत तारण ठेवलेल्या बनावट सोन्याचे दागिने खरे की खोटे याची चाचणी करवीर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी घेतली. जप्त केलेल्या साडेतीन तोळ्यांंच्या चेनची दसरा चौकातील एका नामवंत ज्वेलर्समधील मशीनमध्ये तपासणी केली असता २१.४ कॅरेट सोने दाखविले. त्यानंतर हीच चेन वितळून तिची पुन्हा मशीनमध्ये तपासणी केली असता पूर्णत: तांबे असल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्दे सोन्याची चेन वितळल्यानंतर निघाले तांबे, सर्वच दागिने तांबे असल्याची आरोपींची कबुलीबनावट सोनेतारण कर्जप्रकरण : दसरा चौकातील नामवंत ज्वेलर्समध्ये चाचणी

कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध बँकांत तारण ठेवलेल्या बनावट सोन्याचे दागिने खरे की खोटे याची चाचणी करवीर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी घेतली. जप्त केलेल्या साडेतीन तोळ्यांंच्या चेनची दसरा चौकातील एका नामवंत ज्वेलर्समधील मशीनमध्ये तपासणी केली असता २१.४ कॅरेट सोने दाखविले. त्यानंतर हीच चेन वितळून तिची पुन्हा मशीनमध्ये तपासणी केली असता पूर्णत: तांबे असल्याचे स्पष्ट झाले.

संशयितांनी मूळ तांब्याच्या दागिन्यांवर सोन्याचा जाड मुलामा देऊन ते सोने असल्याचा बनाव करून बँकांची फसवणूक केल्याचे ज्वेलर्सच्या तज्ज्ञांनी सांगितले. आरोपींनीही सर्वच दागिने तांबे असल्याची कबुली दिली. इनकॅमेरा झालेल्या चाचणीचा पोलिसांनी पंचनामा केला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आनंदराव विष्णू राक्षे (४२, रा. सुभाषनगर, कोरेगाव सातारा) यांच्यासह दागिने पुरविणारा व्यापारी फरार आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.आयसीआयसीआय बँक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी), वीरशैव सहकारी बँक, राजे विक्रमसिंह घाटगे कागल को-आॅपरेटिव्ह बँक आणि एक पतसंस्था व तीन सराफांकडे दोन किलो ९१ ग्रॅम बनावट सोनेतारण ठेवून तब्बल ३९ लाख ३२ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या १0 जणांच्या टोळीचा छडा करवीर पोलिसांनी लावला आहे.

जप्त केलेल्या दागिने खरे की खोटे याची चाचणी सोमवारी करवीर पोलिसांनी घेतली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सरकारी पंच सर्जेराव कांबळे, बड्डू दाभाडे, फिर्यादी केडीसीसी बँकेचे चारूदत्त शंकर स्वार, संशयित आरोपी आणि पत्रकार यांच्यासमोर दसरा चौकातील एका ज्वेलर्समध्ये इनकॅमेरा साडेतीन तोळ्यांच्या चेनची चाचणी घेतली.

ज्वेलर्सच्या तज्ज्ञांनी कॅरेट मोजणाºया मशीनमध्ये चेन ठेवून तिची पारख केली. ३0 सेकंदामध्ये २१.४ कॅरेटमध्ये ८९ टक्के सोने दाखविण्यात आले. त्यामध्ये चांदी ३.७५ टक्के, तांबे ७.४, झिंक आणि कॅडबीएम शून्य दाखविले, अशी तीनवेळा चेनची चाचणी घेतली असता वेगवेगळे कॅरेट दाखविण्यात आले. त्यानंतर तीच चेन वितळून पुन्हा मशीनमध्ये चाचणी केली. त्यामध्ये २६. ६४ कॅरेटमध्ये ७५ टक्के तांबे दाखविण्यात आले. चांदी शून्य, झिंक ३. २२ आणि तांबे ७४. ७६ टक्के दाखविले. यावरून हा दागिना पूर्णत: खोटा असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या संपूर्ण चाचणीचा पंचनामा पोलिसांनी केला.वितळल्यानंतर खरे रूप स्पष्टतांब्याच्या दागिन्यांवर सोन्याचा जाड मुलामा देऊन हे सोने बँकेत तारण ठेवले जात असे. हा मुलामा एवढा जाड होता की, बँकेच्या सोने तपासणी यंत्रालाही त्यातील खोटेपणा लक्षात येत नव्हता. काही सराफांनी टिंच बघून सोने असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. दागिने वितळल्यानंतर ते तांबे असल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेले १ किलो दागिने खोटे असून तांबे असल्याची कबुली संशयित आरोपींनी चाचणीच्या वेळीच दिली. जप्त केलेल्या सोन्यामध्ये ३१ चेन, तीन अंगठ्या व कानातील एक जोडी असा बनावट माल आहे.सराफांसह बँकेच्या अधिकाऱ्यांचा सहभाग नाहीसंबंधित बँकांसाठी सोन्याचे मूल्यांकन करून देणाऱ्या सराफांची व बँकेच्या अधिकाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली. मशीनमध्ये बनावट दागिने खरे असल्याचे दाखवित असल्याने यामध्ये सराफ किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांचा सहभाग प्रथमदर्शनी दिसून येत नाही. आरोपींनी दागिने गहानवट ठेवून कर्ज उचलले होते. ते मोडून वितळले असते तर सराफांच्या लक्षात वस्तुस्थिती आली असती, अशी माहिती तपास अधिकारी सुनील पाटील यांनी दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर