शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रसामग्री दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 13:22 IST

Flood Muncipalty Kolhapur : महापुरासह कोणत्याही आपतकालीन घटनेच्या सामन्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रसामग्री दाखल झाल्या आहेत. जीवित हानी होऊ नये, तातडीने आपतकालीन परिस्थिती हाताळता यावी, यासाठी ही यंत्रसामग्री महत्त्वाची ठरणार आहे. त्याची प्रात्यक्षिके सोमवारी पंचगंगा घाटावर झाली.

ठळक मुद्देअग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रसामग्री दाखल

कोल्हापूर : महापुरासह कोणत्याही आपतकालीन घटनेच्या सामन्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रसामग्री दाखल झाल्या आहेत. जीवित हानी होऊ नये, तातडीने आपतकालीन परिस्थिती हाताळता यावी, यासाठी ही यंत्रसामग्री महत्त्वाची ठरणार आहे. त्याची प्रात्यक्षिके सोमवारी पंचगंगा घाटावर झाली.१५० मीटरवरील पाण्यात अडकलेल्यांसाठी लाइफलाइन लाँचर, कोसळलेल्या इमारतीमधील व्यक्तिस सुखरूप बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणारा लोकेशन कॅमेरा आणि आगीत अडकलेल्यांच्या बचावासाठी थर्मल इमॅजीन कॅमेराचा यामध्ये समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच अद्ययावत अशी यंत्रसामग्री दाखल झाली आहे, यामुळे अग्निशमन विभाग आणखीन भक्कम झाला आहे.१५० मीटरवरील पाण्यात अडकलेल्यांसाठी लाँचरमहापालिकेच्या अग्निशमन दलात अद्ययावत अशी मशनरी दाखल झालेल्या आहेत. यामध्ये लाइफलाइन लाँचरचा समावेश आहे. याच्या मदतीने १०० ते १५० मीटर अंतरावरील पाण्यातील अडकलेल्या व्यक्तिजवळ दोरी जाईल व लाइफ जॅकेट त्याच्यापर्यंत पोहोचेल, अशी सुविधा असणारी यंत्रणा आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा व्हिक्टीम लोकेशन कॅमेरा महापालिकेच्या यंत्रसामग्रीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान असलेला कॅमेराही यंदा दाखल झालेला आहे. धोकादायक इमारत कोसळली असल्यास किंवा अरुंद जागेत, बोअरवेलमध्ये एखादा व्यक्ति अडकून पडल्यास त्याचे बचावकार्य करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा हा कॅमेरा आहे. हा कॅमेरा अडकलेल्या व्यक्तिपर्यंत जाऊन त्याची चित्रफित, त्याच्याशी संवाद साधणे शक्य होते. संबंधित व्यक्ति कोणत्या ठिकाणी अडकलेला आहे, याची माहिती त्वरित मिळत असल्याने जीवित हानी होण्यापासून बचाव करणे यामुळे शक्य होते.आगीत अडकलेल्यांच्या बचावासाठी थर्मल इमॅजिन कॅमेरा आगीसारखी घटना घडल्यास धुरामध्ये अथवा आगीच्या लोटात संबंधित व्यक्ति कोणत्या ठिकाणी अडचणीत सापडली आहे, याचा शोध घेणे, तेथील तापमान किती आहे, याची माहिती मिळण्यासाठी महत्त्वाची असणारे थर्मल इमॅजिन कॅमेराही अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाला. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने धुरामध्ये अडकलेल्या किंवा आगिमध्ये अडकलेल्या व्यक्तिचा शोध घेऊन त्याला वाचवले जावू शकते. 

आधुनिक साधने खरेदीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीची मागणी केली होती. राज्य शासनाने तत्काळ निधी उपलब्ध केला. त्यातून लाइफलाइन लाँचर, लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमॅजीन कॅमेरा महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाले.- रणजित चिले,मुख्य अग्निशमन अधिकारी

टॅग्स :floodपूरMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर