शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Kolhapur: अभिनेता गोविंदाने महिला मेळाव्यात नृत्य करून उपस्थितांची जिंकली मने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 4:53 PM

गोविंदासोबत सेल्फी घेण्यासाठी महिलांची गर्दी  

इचलकरंजी: महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंचरत्न कार्यालयात ताराराणी पक्षाच्यावतीने महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास सिनेअभिनेता, शिवसेना नेते गोविंदा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी गोविंदाला नृत्य करण्याची विनंती केली. त्याला मान देत गोविंदाने खुदर्गज चित्रपटातील गाण्यावर दिल से ना... या गाण्यावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली. गोविंदासोबत सेल्फी घेण्यासाठी यावेळी महिलांनी गर्दी केली. मेळाव्यात बोलताना गोविंदा म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांमध्ये जी प्रगती झाली आहे, तितकी प्रगती यापूर्वी झालेली नव्हती. पंतप्रधान नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. देशामध्ये फुगडीचे राजकारण चालू आहे. मात्र, चांगला विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, लखपती दीदी बनविण्याचे स्वप्न पंतप्रधानांनी बघितले आहे. मात्र, यापूर्वीच आमच्या बचत गटाच्या माध्यमातून महिला लखपती झाल्या आहेत. महिलांना साडी उत्पादन आणि बाहुल्या निर्मितीचा उद्योग उपलब्ध करून देणार आहे. तसेच पाणीप्रश्नही सोडविणार आहे.शिवसेनेच्या उपनेत्या शितल म्हात्रे म्हणाल्या, संजय राऊत हे खंजिर खुपसल्याची भाषा करीत आहेत. मात्र, त्यांच्याकडे विकासाचा कोणताही रोड मॅप नाही. मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे राममंदिरचे स्वप्न पूर्ण केले आहे.मेळाव्यात वेदांतिका माने, किशोरी आवाडे, अहमद मुजावर, राहुल आवाडे, आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या संयोजिका मौसमी आवाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, मंगला सुर्वे, अर्चना कुडचे, सपना भिसे, सीमा कमते, मेघा माने, प्रकाश मोरे, सुनील पाटील, प्रकाश पाटील, आदी उपस्थित होते. अंजली बावणे यांनी सूत्रसंचालन व नजमा शेख यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovindaगोविंदाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४dhairyasheel maneधैर्यशील मानेkolhapur-pcकोल्हापूर