शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By admin | Updated: January 22, 2015 00:19 IST

स्थायी सभापती : भगदाडाची गंभीर दखल

कोल्हापूर : ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या ढासळत असलेल्या तटबंदीचे काम सुरू करण्याबरोबरच अखेरच्या घटका मोजत असलेल्या रंकाळाच्या पुनरुज्जीवनाचे शिवधनुष्य आज, बुधवारी स्थायी समितीचे सभापती आदिल फरास यांनी उचलले. सोमवारी (दि. १९) रात्री पडलेल्या भगदाडाची पाहणी करून फरास यांनी तत्काळ ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.अगोदरच प्रदूषणाने मरणासन्न झालेल्या रंकाळ्याची संरक्षक तटबंदी कोसळण्याची मालिकाच सुरू झाल्याने या ऐतिहासिक तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. तटबंदीसाठी मास्टर प्लॅन तयार आहे. लाखावर निधी उपलब्ध करून देऊ, अशा पोकळ आश्वासनांचा खेळच पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. रंकाळा मजबुतीकरण व नैसर्गिक पुनर्भरण करण्याचे काम पैशांअभावी रखडल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आज महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली रंकाळ्याला भेट दिलेल्या शिष्टमंडळानेही पुन्हा एकदा रंकाळ्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसेवक शारंगधर देशमुख, परीक्षित पन्हाळकर, रेखा पाटील, आदी उपस्थित होते. मागील वेळीप्रमाणेच रंकाळ्याप्रश्नी ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ ठरू नये, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.गेल्या वर्षभरात दोनवेळा रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडील बाजूच्या कोसळलेल्या तटबंदीच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी तटबंदीचा आणखी एक मोठा भाग कोसळला. ठोस उपाययोजना न राबविल्यास उद्यानाकडील तटबंदीचा आणखी मोठा भाग पाण्यात कोसळण्याची शक्यता आहे. शालिनी पॅलेससमोरील रंकाळा उद्यान परिसरात तलावाच्या आतील बाजूच्या तटबंदीमधील दोन दगडांना सांधून ठेवणाऱ्या सिमेंटचा दर्जा खराब झाल्याने तटबंदीचे दगड कोसळत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भेटीवेळी फरास यांना दिली. वेळीच उपाय न योजल्यास किमान पाचशे फुटांची तटबंदी जलसमाधी घेण्याची शक्यता आहे. नारळाच्या झाडांच्या मुळांमुळे तटबंदीला धोका पोहोचत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. मात्र, झाडे न तोडताही तटबंदी सुरक्षित करता येऊ शकते. तथापि, चर्चेपलीकडे महापालिकेत ठोस कारवाईसाठी काहीही होताना दिसत नसल्याची नाराजी फरास यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)