प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आठ दिवसांत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:53+5:302021-02-05T06:58:53+5:30

‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ या उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर विभागातील उच्चशिक्षण क्षेत्रातील विविध घटकांचे प्रश्न समजून घेऊन ते ...

Action on officers and employees pending cases within eight days | प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आठ दिवसांत कारवाई

प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आठ दिवसांत कारवाई

‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ या उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर विभागातील उच्चशिक्षण क्षेत्रातील विविध घटकांचे प्रश्न समजून घेऊन ते मार्गी लावल्याचे समाधान आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिनोळी (ता. चंदगड) येथे बाळासाहेब ठाकरे शैक्षणिक संकुल उभारले जाणार आहे. त्यासाठीच्या जागेचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यापीठाला दिले आहे. या संकुलात कौशल्य व उद्योजकता विकासाचे अभ्यासक्रम सुरू होतील. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नाशिक) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या संकुलासाठी पाच कोटी रुपये देण्याचा मुक्त विद्यापीठाचा प्रस्ताव आहे. ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ या उपक्रमासाठी निवेदन स्वीकारण्यासाठी विद्यापीठाने तयार केलेले पोर्टल उपयुक्त ठरले. या पोर्टलचा उपयोग अन्य विभागांमधील उपक्रमांसाठी करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, आदी उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव विद्यापीठाने द्यावा.

विद्यापीठातील अध्यासन केंद्रांना अनुदान देण्याचा विचार केला जाईल.

महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने होतील.

महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या आठवड्यात होईल.

फोटो (२५०१२०२१-कोल-युनिव्हर्सिटी एमयूओ) : कोल्हापुरात सोमवारी शिनोळी (ता. चंदगड) येथील शैक्षणिक संकुलासाठीच्या सामंजस्य करारावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी शेजारी डावीकडून ओ. पी. गुप्ता, डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते.

Web Title: Action on officers and employees pending cases within eight days