महापालिका निवडणुकीत गद्दारांना संधी नको, शिवसेना नेत्यांची मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 10:56 IST2020-12-28T10:51:09+5:302020-12-28T10:56:06+5:30

Uday Samant- गद्दारी करणाऱ्यांमुळे पक्षाचे नुकसान होत आहे. अशा गद्दारांचा एकदा शोध घ्याच आणि त्यांना कडक शिक्ष करा. महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना संधी देऊ नका, अशा सूचना शिवसेनेच्या कोल्हापुरातील नेत्यांनी केल्या. संपर्कमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी शासकीय विश्रामगृह येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

According to Shiv Sena leaders, traitors do not want a chance in the municipal elections | महापालिका निवडणुकीत गद्दारांना संधी नको, शिवसेना नेत्यांची मते

महापालिका निवडणुकीत गद्दारांना संधी नको, शिवसेना नेत्यांची मते

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीत गद्दारांना संधी नको, उदय सामंत यांच्यासोबतच्या बैठकीत शिवसेना नेत्यांची मते शिवसेनेची पहिली बैठक, गटतट विसरून सर्वजण उपस्थित

कोल्हापूर : गद्दारी करणाऱ्यांमुळे पक्षाचे नुकसान होत आहे. अशा गद्दारांचा एकदा शोध घ्याच आणि त्यांना कडक शिक्ष करा. महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना संधी देऊ नका, अशा सूचना शिवसेनेच्या कोल्हापुरातील नेत्यांनी केल्या. संपर्कमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी शासकीय विश्रामगृह येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर शहर शिवसेनेमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात वाद असल्याचे जगजाहीर आहे. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बैठक घेतली. या बैठकीवेळी ते एकत्र आले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षातील गद्दरांचा विषय चर्चेत आहे. यामुळेच हा विषय या बैठकीत उपस्थित झाला असण्याची शक्यता आहे.

एकदिलाने काम करून जास्तीत जास्त जागा निवडून आणाव्यात, असे आवाहन संपर्कमंत्री सामंत यांनी केले. यावेळी गट-तट बाजूला ठेवून निवडणूक लढल्यास शिवसेनेच्या २५ पेक्षा जास्त जागा निश्चित येतील, असा विश्वासही नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव यांची उपस्थिती होती.


बैठकीनंतर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पोषक वातावरण असून, भाजपला निवडणुकीत दूर ठेवण्याची सूचना केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने एकत्र निवडणूक लढविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतील. शिवसेनेतील गटबाजीमुळे आतापर्यंत पक्षाला तोटाच झाला आहे. आता मात्र महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने शहरातील गटबाजी संपवा, अशा सूचना शिवसेनेतील नेत्यांना केल्या. तसेच ८१ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू करण्याचे सांगितले आहे.

मतभेद आहेत, मनभेद नाहीत

शहर शिवसेनेतील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसत असल्याबाबत विचारले असता मंत्री उदय सामंत म्हणाले, शहर शिवसेनेमध्ये मतभेद नाहीत, मनभेद आहेत. ही पक्ष जिवंत असण्याची लक्षणे आहेत. संपर्कप्रमुख दुधवडकर आणि शिवसेनेचे दोन्ही खासदार हा वाद मिटवतील आणि आम्ही महापालिकेची निवडणूक एकसंध राहून लढू.

Web Title: According to Shiv Sena leaders, traitors do not want a chance in the municipal elections