Accident on Pune-Bangalore highway | पुणे-बंगलोर महामार्गावर अपघात, चार जखमी

पुणे-बंगलोर महामार्गावर अपघात, चार जखमी

कोल्हापूर - पुणे बंगलोर महामार्गवर कोल्हापूर सांगली फाटा नजीक कार ची ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक बसली. यात दोन महिला  गंभीर जखमी झाल्या.  तर दोघींना मुका मार लागला आहे. जखमींना सरकारी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पावणे दोनच्या सुमारास महाडिक बंगल्यासमोर घडला.

कारमधील सर्वजण इचलकरंजीला जात असल्याचे समजले. तर काही जण भोजला जाणार होते अशी माहिती घटनास्थळी समजली. जखमी अवस्थेत असल्याने त्यांना नीटशी माहिती देता येत नव्हती. चालकाचे नाव नाव वैभव अनंत बडबडे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Accident on Pune-Bangalore highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.