कुंभोज ते दानोळी मार्गावर अपघात, मोटारसायकल चालक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 19:59 IST2024-04-28T19:59:03+5:302024-04-28T19:59:17+5:30

याची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली.

Accident on Kumbhoj to Danoli road, motorcyclist killed | कुंभोज ते दानोळी मार्गावर अपघात, मोटारसायकल चालक ठार

कुंभोज ते दानोळी मार्गावर अपघात, मोटारसायकल चालक ठार

कुंभोज : कुंभोज ते दानोळी मार्गावर चारचाकी व मोटारसायकल यांच्यात समोरा समोर झालेल्या जोरदार अपघातात  मोटारसायकल चालक तानाजी बाजीराव कोळी (वय ४८ रा.माणगाव) याचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीवर पाठीमागे बसलेल्या त्यांची आई शांताबाई बाजीराव कोळी (वय ७०) मुलगी वैष्णवी तानाजी कोळी ( वय १३ ) हे जखमी झाले. याची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली.

हा अपघात रविवारी दुपारच्या वेळी  झाला.घटनास्थळी हातकणंगले पोलीस  येऊन पंचनामा केला.पोलिसातून मिळालेली माहिती अशी तानाजी बाजीराव कोळी हे मोटार सायकल वरून आपली आई व मुलगी यांना घेऊन सांगल वाडी येथे एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटपुन ते आपल्या मोटर सायकल वरून घरी माणगावला जात असताना कुंभोज गावच्या हद्दीत असलेल्या पार्वती सहकारी पाणीपुरवठा संस्थे जवळ  कोथळी कडे चाललेल्या चारचाकीला समोरासमोर धडक होवून अपघातात तानाजी कोळी यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Accident on Kumbhoj to Danoli road, motorcyclist killed