Kolhapur: डंपर चालकाने अचानक ब्रेक लावला, पाठिमागून कार धडकल्या; सांगली फाटा येथे अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 18:20 IST2024-06-26T18:18:57+5:302024-06-26T18:20:39+5:30
चारचाकी गाड्यांचा चक्काचूर होऊन लाखो रुपयांचे नुकसान, दोन तासापेक्षा अधिक वेळ वाहतूक ठप्प

Kolhapur: डंपर चालकाने अचानक ब्रेक लावला, पाठिमागून कार धडकल्या; सांगली फाटा येथे अपघात
शिरोली : शिरोली सांगली फाटा येथे महामार्गावर चौरंगी अपघातात झाला यात चारचाकी गाड्यांचा चक्काचूर होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. किरकोळ जखमी वगळता सुदैवाने जिवीतहानी टळली. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथे बुधवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने डंपर चालला होता. महामार्गाचे काम सुरू असल्याने डंपर चालकाने अचानक ब्रेक लावला. यावेळी पाठिमागून येणाऱ्या कारचालकांनेही सावधानता बाळगत ब्रेक लावला. पण भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दोन्ही गाड्यांना जोराची धडक दिली.
या धडकेमुळे दोन्ही कार पुढे थांबलेल्या डंपरला धडकल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात दोन्ही कारचे नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने किरकोळ जखमी वगळता कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तासापेक्षा अधिक वेळ ठप्प झाली होती.