शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमधील लसीकरणाचा वेग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

जयसिंगपूर / शिरोळ / दानोळी : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा. जनजागृती करून जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी सर्वांनीच ...

जयसिंगपूर / शिरोळ / दानोळी : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा. जनजागृती करून जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. ३० एप्रिलअखेर लसीकरण पूर्ण करावे. त्याकरिता लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करून घ्यावी. प्रसंगी खासगी डॉक्टरांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

शनिवारी देसाई हे शिरोळ तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी जयसिंगपूर येथे नगरपालिकेत लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले.

अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे होत्या. सकाळी जिल्हाधिकारी देसाई यांनी दानोळी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर जयसिंगपूर येथे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, शिरोळ तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. संचारबंदी आदेशाचे पालन करण्याच्या वेळोवेळी सूचना द्याव्यात. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. बैठकीस नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी टीना गवळी, उपमुख्याधिकारी पवन म्हेत्रे, जि. प. समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. दातार, डॉ. पांडुरंग खटावकर उपस्थित होते. दानोळी येथे जि. प. सदस्या शुभांगी शिंदे, सरपंच सुनीता वाळकुंजे, उपसरपंच सुनील शिंदे उपस्थित होते. तर, शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेले लसीकरण, स्वॅब संकलन, निरीक्षण केंद्र याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, डॉ. महेंद्र कुंभोजकर उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन कोविड लसीकरणाची माहिती घेतली.

फोटो - ०३०४२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे पालिका सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याधिकारी टीना गवळी, जि. प. समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे उपस्थित होत्या.