एसीबीची दोन ठिकाणी कारवाई, २ हजार स्वीकारताना हुपरीचा तलाठी सापळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 17:36 IST2020-06-19T17:35:09+5:302020-06-19T17:36:43+5:30

प्रथम कंत्राटी पध्दतीवर व त्यानंतर कायमस्वरुपी कामावर आदेश काढून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीपीआरमधील वाहनचालक राहूल प्रल्हाद बट्टेवार यास आणि विंधन विहिरीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हुपरी येथील तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने या दोघांना लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले.

ACB's action in two places, while accepting Rs | एसीबीची दोन ठिकाणी कारवाई, २ हजार स्वीकारताना हुपरीचा तलाठी सापळ्यात

एसीबीची दोन ठिकाणी कारवाई, २ हजार स्वीकारताना हुपरीचा तलाठी सापळ्यात

ठळक मुद्देएसीबीची दोन ठिकाणी कारवाई२ हजार स्वीकारताना हुपरीचा तलाठी सापळ्यात

कोल्हापूर - प्रथम कंत्राटी पध्दतीवर व त्यानंतर कायमस्वरुपी कामावर आदेश काढून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीपीआरमधील वाहनचालक राहूल प्रल्हाद बट्टेवार यास आणि विंधन विहिरीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हुपरी येथील तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने या दोघांना लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले.

२  हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात

तक्रारदार याने मे 2020 मध्ये हुपरी गावातील त्याच्या गटक्रमांक 1876 मधील शेतामध्ये बोरवेल मारली आहे. याची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी आरोपी तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने (व.व. 54, रा. प्लॉट क्र. 54 संभाजीपूर अण्णासाहेब चकोते शाळेसमोर) याच्याकडे 16 जून रोजी अर्ज दिला होता तेव्हा तक्रारदार कोतवाल मुदाळे यांना भेटले असता तलाठी शेरखाने बोरवेलची नोंद घेण्यासाठी 3 हजार रुपये मागत आहेत पैसे दिल्याशिवार ते तुमच्या बोरवेलची नोंद सातबाऱ्यावर करणार नाहीत तेव्हा तुम्ही त्यांना जाऊन भेटा असे सांगितले. त्याबाबत तक्रारदारने तलाठी शेरखाने विरुध्द तक्रार अर्ज दिला होता.

त्यानुसार आज हुपरी तलाठी कार्यालयामध्ये शासकीय पंच साक्षीदाराच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता पडताळणीमध्ये शेरखाने याने तडजोडीअंती 2 हजार रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज लावलेल्या सापळ्यात 2 हजार रक्कम स्वीकारताना तलाठी शेरखाने रंगेहात सापडला. हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, हवलदार मनोज खोत, जवान शदर पोरे, नवनाथ कदम, सुनील घोसाळकर यांच्या पथकाने केली.

लाचेच्या अथवा अपसंपदेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी लाच- लुचपत प्रतिबंधक विभाग टोल फ्री क्रमांक 1064, 0231-2540989, व्हॉटस् ॲप क्रमांक- 7875333333, 9011228333 यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक बुधवंत यांनी केले आहे.

Web Title: ACB's action in two places, while accepting Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.