Kolhapur News: ज्युबली फंड फीविरोधात आंदोलन, शिवाजी विद्यापीठात अभाविप कार्यकर्त्यांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 14:15 IST2025-12-20T14:11:57+5:302025-12-20T14:15:11+5:30
या घटनेचे पडसाद सिनेट बैठकीत उमटले

Kolhapur News: ज्युबली फंड फीविरोधात आंदोलन, शिवाजी विद्यापीठात अभाविप कार्यकर्त्यांना मारहाण
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची सिनेट सभा सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते प्रवेशद्वारासमोर सर्व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून ज्युबली फंड फी आकारली जाण्याच्या विरोधात आंदोलन करत असताना शिवाजी विद्यापीठ गार्ड आणि पोलिस प्रशासनाकडून मारहाण करण्यात आली.
कार्यकर्ते सकाळपासून दरवाजासमोर धरणे धरून बसले होते. यासंदर्भातील निवेदन त्यांनी कुलगुरू आणि कुलसचिव यांच्याकडे दिले होते. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांना घोषणाबाजी केली असताना अचानक विद्यापीठाचे गार्ड आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली. संघटनेचा तीव्र निषेध केला आहे.
दरम्यान, या घटनेचे पडसाद सिनेट बैठकीत उमटले. व्यवस्थापन समितीचे सदस्य अमित कुलकर्णी, रतन कांबळे आणि श्रीनिवास गायकवाड यांनी निषेध करून कारवाईची मागणी केली. त्यावर कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी बाहेर जाऊन निवेदन स्वीकारले. सिनेट सभेत त्यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभारी कुलगुरू यांनी यासंदर्भात सभागृहात कारवाई करण्यासंदर्भात सदस्यांना आश्वासन दिले.