शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: गर्भपात केला, मृत अर्भके दूधगंगा नदीत फेकली; फॉरेन्सिककडून तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:32 IST

श्रद्धा हॉस्पिटलच्या दोघी कर्मचारी ताब्यात ; बिद्री, गारगोटीतील चार एजंटही जेरबंद

कोल्हापूर : बिद्री येथील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. श्रद्धा हॉस्पिटलमधील दोन महिला कर्मचारी आणि बिद्री, गारगोटी परिसरातील चार एजंटना तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी गुरुवारी (दि. २६) चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुन्ह्यातील त्यांचा सहभाग स्पष्ट होत असल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. गर्भपात केल्यानंतर मृत अर्भकांची बिद्री येथील दूधगंगा नदीत विल्हेवाट लावल्याची माहिती अटकेतील युवराज पाटील याच्या चौकशीतून समोर आली आहे.बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्रात कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील अनेक महिलांचे गर्भपात झाल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर येत आहे. हॉस्पिटलमधील महिला कर्मचारीच गर्भपाताची औषधे देत होत्या. त्याच मृत अर्भके दूधगंगा नदीत फेकून त्याची विल्हेवाट लावत होत्या, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. त्यामुळे दोन महिला कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. डॉ. पाटील याच्या कॉल डिटेल्सवरून आणखी काही एजंट आणि डॉक्टरांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्याचा मित्र डॉ. उत्तमकुमार सरदेसाई याचाही अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.डॉक्टर पाटील याच्याकडे तपासणीसाठी गर्भवतींना पाठवणाऱ्या आठ ते दहा एजंटची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील बिद्री आणि गारगोटी परिसरातील चौघांना पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्यावर अटकेची कारवाई करून शुक्रवारी कागल न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी दिली.फॉरेन्सिकच्या पथकाकडून तपासणीमृत अर्भकांचे अवशेष मिळविण्यासाठी फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने बिद्री येथील दूधगंगा नदीत पुरावे शोधले. मात्र, पथकाच्या हाती फारसे काही लागले नाही. बिद्री येथील कचरा डेपो, हॉस्पिटलच्या आसपास असलेली कचरा कोंडाळी, रिकाम्या जागांमध्येही खड्डे काढून मृत अर्भकांची विल्हेवाट लावल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Aborted fetuses thrown in river; forensics investigate Kolhapur illegal abortions.

Web Summary : Kolhapur police investigate illegal abortions at Bidri hospital. Staff disposed of fetuses in the Dudhganga River. Several arrests were made; forensics searched for remains. More agents and doctors are suspected to be involved.