शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
4
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
5
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
6
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
7
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
8
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
9
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
10
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
11
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
12
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
13
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
14
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
15
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
16
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
17
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
18
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
19
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
20
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
Daily Top 2Weekly Top 5

‘अब्बा, मंै तो कलेक्टर बन गया’

By admin | Updated: June 25, 2016 00:41 IST

अन्सार शेख यांनी उलगडला यशाचा प्रवास

आयुब मुल्ला -- खोची --निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेमध्ये गेलो. बराच वेळ तेथे थांबून राहिलो. अखेर सायंकाळी तेथून बाहेर पडलो. काही वेळातच मित्राचा फोन आला तू यशस्वी झालास अन् मी माझ्या खिशातला साधा किपॅडचा फोन काढला अन् फोनवरून म्हणालो, ‘अब्बा, मैं कलेक्टर बन गया! रिक्षा चला रहा हूँ, सुनाई नही आता और एक बार बोलो क्या हुआ? अब्बा मैं कलेक्टर बन गया!’ यूपीएससीत यशस्वी झालेल्या अन्सार शेख यांनी अशी माहिती पहिल्यांदा आपल्या वडिलांना सांगितली. त्याच अन्सार यांनी आपला यशस्वी प्रवास सांगताना हे संवादाचे व वाटचालीचे वर्णन वास्तवपणे मांडले. पाय ठेवायलाही जागा नसणारे सभागृह खचाखच भरले होते. त्यांच्या या यशाच्या संवादाला सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. युनिक अकॅडमीच्यावतीने शुक्रवारी सकाळी आय.ए.एस. झालेले अन्सार शेख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपला यशाचा मार्ग सांगितला. केशवराव भोसले नाट्यगृह विद्यार्थ्यांच्या गर्दीने खचाखच भरले होते. अन्सार शेख यांच्या आतापर्यंतच्या यशाला प्रतिकूलतेचे अनेक कंगोेरे आहेत. आपला प्रवास उलगडताना त्यांनी सांगितलेले किस्से मनाचा ठाव घेणारे आहेत. वडील रिक्षा चालविणारे, आई मजुरी करणारी, दोन बहिणी, एक लहान भाऊ असे कुटुंब. घरात शिकलेले कोणीही नव्हते. चौथीतून शाळा बंद करण्याचा निर्णय वडिलांनी घेतला होता; पण माझ्या गुणवत्तेची खात्री शाळेतील गुरुजींनी वडिलांना दिली. दहावीला ७६ टक्के गुण मिळाले. अकरावी-बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो; पण हे होत असताना अंधकारमय व शोषित कुटुंबात जीवन जगल्याच्या वेदना टोचत होत्या. मी सातवीत असतानाच परिस्थितीच्या दबावामुळे आई मनोरुग्ण झाली. ही तर माझ्यावर दडपणाचा आघात करणारी घटना होती. मी डगमगलो नाही. पुण्यात आलो. नोकरी करीत आर्टस्मधून ग्रॅज्युएट झालो.दोन-तीन मित्रांनी पुस्तके घेण्यासाठी पैसे दिले. खर्चालाही सतत मदत केली. युनिकचे तुकाराम जाधव यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. सर्व परीक्षांचा अभ्यास नियोजनपूर्वक केला व पास झालो. पुण्यासारख्या श्रीमंत कुटुंबीयांच्या मुलामुलींचे स्टँडर्ड अन् माझी गरिबी याची मी तुलना केली नाही. माझ्या प्रत्येक पावलांवर अंधार, संघर्ष होता; पण त्यातून मला प्रकाशाची वाट दिली ती शिक्षणाच्या आत्मविश्वासाने. त्यामुळे वयाच्या २१ व्या वर्षी मी कलेक्टर झालो. यशस्वी होण्यासाठी स्पर्धा स्वत:च्या दुर्गुणाशी करा, अभ्यासात सातत्य ठेवा, संयमी राहा, सकारात्मक विचार करा, प्रचंड मेहनत करून इच्छाशक्ती बाळगा, टार्गेटवरच फोकस करा, श्रद्घा ठेवा, असाही सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. झोपडपट्टीत राहणारे अन्सार शेख इतके दिलखुलास वास्तव मांडत गेले अन् गर्दीने भरलेल्या नाट्यगृहात प्रेरणादायी वातावरण तयार होऊन यशस्वी वाटचालीस टाळ्यांचा कडकडाट होत प्रतिसाद मिळाला.शेळगाव (जि. जालना) या ग्रामीण बाज असलेल्या मागासपणाच्या छायेत असणाऱ्या गावातील अन् दारिद्र्यरेषेखाली गरीब कुटुंबात जन्मलेल्या अन्सार यांचा यावर्षीच्या यूपीएससीतील लक्षवेधी चेहरा ठरला आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्याचे केडर जाहीर झाले. राज्यात मराठी माध्यमातून व वयाच्या एकविसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात ते एकमेव यशस्वी ठरले आहेत. ४वडिलांना घरकुलासाठी ३० हजार रुपये मंजूर झाले होते. ते मिळविण्यासाठी लाच द्यावी लागली, असे मला वडिलांनी सांगितले. तेव्हाच मी ठरविले. मोठा अधिकारी बनून गरिबांना न्याय देणारी सेवा करायची. यादृष्टीने प्रयत्न केले.