लातूरच्या तरुणाला आजऱ्यात ट्रकसह लुटले, हातपाय बांधून जंगलात टाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 13:19 IST2022-07-21T13:19:11+5:302022-07-21T13:19:33+5:30

संबंधित तरुण पहाटे शुद्धीवर आल्यानंतर हातपाय घासत, लोळत रस्त्यावर आला.

A youth from Latur was robbed by four youths in a forest area near Ajara along with a truck | लातूरच्या तरुणाला आजऱ्यात ट्रकसह लुटले, हातपाय बांधून जंगलात टाकले

लातूरच्या तरुणाला आजऱ्यात ट्रकसह लुटले, हातपाय बांधून जंगलात टाकले

सदाशिव मोरे

आजरा : लातूर येथील एका तरुणास भारत बेंज ट्रकसह आजऱ्याजवळील जंगलक्षेत्रात बोलेरो गाडीतून आलेल्या चार तरुणांनी लुटले. यानंतर त्याला राप नावाच्या जंगलात हातपाय बांधून टाकण्यात आले. अशोक अर्जुन पोवार असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास आजरा आंबोली रस्त्यावरील जंगल क्षेत्रात घडली. काळोख्या जंगलात हात, पाय, तोंड बांधून टाकल्याने रात्रभर पावसात भिजल्याने अशोक भेदरला आहे.

अशोक पवार या तरुणाला बोलेरो गाडीतून आलेल्या चार तरुणांनी कणकवलीच्या पुढे येऊन ट्रकच्या पुढे गाडी आडवी लावली. दरवाजा उघड नाहीतर काच फोडणार अशी धमकी दिल्यामुळे त्याने ट्रकचा दरवाजा उघडला. त्यानंतर गाडीतील दोन तरुण ट्रक मध्ये बसले. या तरुणांनी त्याला सावंतवाडी पर्यंत आणले. त्या ठिकाणी त्याच्या ताब्यातील ट्रक काढून घेऊन त्याला बोलेरो गाडीत घातले. तेथून ते आजऱ्याकडे आले.

आंबोलीच्या पोलीस चेक पोस्ट नाक्याला अशोक पोवार यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला तोंड दाबून त्याच्या अंगावर दोघेजण बसले व तिथून ते पुढे आले. आजरा आंबोली रोडवरील तुळशी धाब्याजवळ अशोकचे हात पाय व तोंड बांधून प्रचंड मारहाण करुन जंगल क्षेत्रात नेऊन टाकले. अन् त्या ठिकाणाहून हे चौघे पसार झाले. दरम्यान अशोक पहाटे शुद्धीवर आल्यानंतर हातपाय घासत, लोळत रस्त्यावर आला. त्याला उपचारासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: A youth from Latur was robbed by four youths in a forest area near Ajara along with a truck