Kolhapur: वाढदिवसा दिवशीच तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, विष पिऊन संपवले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 19:37 IST2023-11-27T19:36:59+5:302023-11-27T19:37:25+5:30

नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील त्रिमूर्ती कॉलनीतील वैभव विश्वास पाटील (वय २८ ) तरुणाने तणनाशक प्राशन ...

A young man from Nave Pargaon in Kolhapur ended his life by drinking poison on his birthday | Kolhapur: वाढदिवसा दिवशीच तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, विष पिऊन संपवले जीवन 

Kolhapur: वाढदिवसा दिवशीच तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, विष पिऊन संपवले जीवन 

नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील त्रिमूर्ती कॉलनीतील वैभव विश्वास पाटील (वय २८ ) तरुणाने तणनाशक प्राशन करून आत्महत्या केली. वाढदिवसा दिवशीच वैभवने आपलं जीवन संपवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.        

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नवे पारगावच्या महात्मा गांधी रुग्णालया जवळच्या त्रिमूर्ती कॉलनीत वैभव आई, वडील व भावासह राहत होता. वैभव एका रक्तपेढीत नोकरीत होता. त्याचा काल, रविवारी वाढदिवस होता. तो मोटरसायकल घेऊन पन्हाळा तालुक्यातील मसाई पठारावर आला अन् तिथेच त्याने तणनाशक प्राशन केले. तेथून तो नावली-बोरपळे दरम्यान आला. त्रास होताच मदतीसाठी हातवारे करू लागला. 

यावेळी एका मोटरसायकलस्वाराने थांबून चौकशी केली. यावेळी वैभव यांनी तणनाशक प्राशन केल्याचे सांगितले. तत्काळ त्याला उपचारासाठी बोरपळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र आज सोमवारी पहाटे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: A young man from Nave Pargaon in Kolhapur ended his life by drinking poison on his birthday