दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 17:23 IST2022-08-03T17:22:07+5:302022-08-03T17:23:13+5:30

घरात भांडण करून बाहेर पडला अन् विहिरीत घेतली उडी

A young man committed suicide by jumping into a well under the influence of alcohol in Chikodi | दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

चिकोडी : घरात भांडण करून दारूच्या नशेत विहिरीत उडी टाकून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना चिकोडी शहरातील हालट्टी येथे घडली. गौसमोदिन मुस्तफा जमादार (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, गौसमोदीन हा वाहन चालक असून काल, मंगळवारी रात्री घरात भांडण करून बाहेर पडला होता. त्यानंतर नजीकच्याच विहिरीत उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. यावेळी काही नागरिकांनी पाहिल्याने रात्रभर नागरिक व अग्निशमन दलाचे जवान मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण मृतदेह हाती लागला नाही.

बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सरकारी इस्पितळाकडे पाठविण्यात आला. घटनास्थळी चिकोडी पोलीस ठाण्याचे पीएसआय यमनाप्पा मांग यांनी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: A young man committed suicide by jumping into a well under the influence of alcohol in Chikodi