आजऱ्यात विजेचा शाॅक लागून महिलेचा मृत्यू, शेजारील वाचवायला गेलेली महिला सुदैवाने बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 12:26 IST2023-05-10T12:25:58+5:302023-05-10T12:26:18+5:30

आई-बाबाविना मुलगा निराधार

A woman died due to electric shock in Ajraja, the woman who went to save the neighbor was fortunately saved | आजऱ्यात विजेचा शाॅक लागून महिलेचा मृत्यू, शेजारील वाचवायला गेलेली महिला सुदैवाने बचावली

आजऱ्यात विजेचा शाॅक लागून महिलेचा मृत्यू, शेजारील वाचवायला गेलेली महिला सुदैवाने बचावली

सदाशिव मोरे

आजरा  : आजरा येथील एकता काॅलनीत पाण्याच्या मोटरचा शॉक लागून अनिता संभाजी कांबळे (वय ४३) ही महिला जागीच मयत झाली. ही घटना आज, बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. यावेळी आरडाओरड झाल्याने वाचविण्यास गेलेल्या सरोज सचिन बिरजे या महिलेलाही शाॅक लागला मात्र सुदैवाने ती बचावली.

अनिता कांबळे या सकाळी ८.३० च्या सुमारास पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेल्या असता त्यांना शाॅक लागला. शॉक लागल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. मात्र त्या विजेच्या धक्क्याने जमिनीवर पडल्या व त्याच ठिकाणी उपचारापूर्वीच मयत झाल्या. 

आरडाओरड झाल्याने शेजारील सरोज बिरजे या धावत आल्या. व त्यांनी अनिता कांबळे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही वीजेचा शाॅक लागला पण सुदैवाने त्या बचाविल्या. अनिता कांबळे यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले असून त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. या घटनेने एकता काॅलनीवर एकच शोककळा पसरली आहे.

Web Title: A woman died due to electric shock in Ajraja, the woman who went to save the neighbor was fortunately saved