कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वाघबीळ घाटात ट्रक उलटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 18:52 IST2024-02-24T18:51:44+5:302024-02-24T18:52:06+5:30
सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर -रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटातील उतरणीच्या वळणावर पाईपसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरच्या पोत्यांनी भरलेला ...

कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वाघबीळ घाटात ट्रक उलटला
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटातील उतरणीच्या वळणावर पाईपसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरच्या पोत्यांनी भरलेला ट्रॅक उलटला. ही घटना काल, शुक्रवारी रात्री घडली. पोत्यांच्या लोडिंगमुळे ट्रक रस्त्याकडील संरक्षक कटड्याला धडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती, ट्रक चालक कुमार बसवन्ना डंगरे (वय ३०, रा.नागराळ ता.चिकोडी जि.बेळगाव) शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरीहून कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरून पाईप तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा पावडरची पोती घेऊन इचलकंरजीकडे जात होता. मध्यरात्री ट्रक वाघबीळ घाटात उतरणीच्या वळावर समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक दरीकडील बाजूस उलटला. ट्रकमध्ये २५ टन पोती भरली होती. पोत्यांच्या लोडिंगमुळे ट्रक रस्त्याकडील संरक्षक कटड्याला धडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला. चालक ट्रकच्या काचा फोडून बाहेर पडला. अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले.