कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर भामटेत उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली, सुदैवाने चालक बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 19:06 IST2023-01-13T19:04:51+5:302023-01-13T19:06:05+5:30
दैव बलवत्तर म्हणून चालक बचावला. तर, ट्रॅक्टरचे देखील नुकसान झाले नाही

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर भामटेत उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली, सुदैवाने चालक बचावला
प्रकाश पाटील
कोपर्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर भामटे येथे नागमोडी वळणावर उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. या अपघातात सुदैवाने ट्रँक्टर चालक बचावला. एकनाथ रामभाऊ करे (रा. हिंगोली) असे त्याचे नाव आहे. हा अपघात सकाळच्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चालक एकनाथ करे हा भुयेवाडी येथून उसाने भरलेली ट्रॅक्टर -ट्रॉली घेऊन कोल्हापूर गगनबावडा मार्गे डी. वाय. पाटील साखर कारखान्याकडे निघाला होता. कळंबे व भामटे दरम्यान असलेल्या नागमोडी वळणावर अज्ञात वहान अचानक समोर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उसाच्या ट्रॉलीसह थेट रस्त्यालगत शेतात उलटला.
रस्त्यालगच्या झाडात मागील ट्रॉली अडकली तर पुढील ट्रॉली पलटी झाली. दैव बलवत्तर म्हणून चालक एकनाथ करे बचावला. तर, ट्रॅक्टरचे नुकसान देखील झाले नाही.