Kolhapur: पार्लेत आढळला तब्बल दहा फूट लांबीचा किंग कोब्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 12:33 IST2023-12-12T12:31:45+5:302023-12-12T12:33:37+5:30

चंदगड : झाडावर अडकून बसलेल्या तब्बल १० फूटहून अधिक लांबीच्या किंग कोब्र्याला सुरक्षित पकडत वनविभागाच्या मदतीने पार्ले ग्रामस्थांनी जंगल ...

A ten foot long king cobra was found in Parle Chandgad Taluka Kolhapur District | Kolhapur: पार्लेत आढळला तब्बल दहा फूट लांबीचा किंग कोब्रा

Kolhapur: पार्लेत आढळला तब्बल दहा फूट लांबीचा किंग कोब्रा

चंदगड : झाडावर अडकून बसलेल्या तब्बल १० फूटहून अधिक लांबीच्या किंग कोब्र्याला सुरक्षित पकडत वनविभागाच्या मदतीने पार्ले ग्रामस्थांनी जंगल अधिवासात सोडत त्याला जीवनदान दिले.

पार्ले येथील भिकाजी मयेकर यांच्या पोल्ट्रीजवळील झाडावर १० फूट अधिक लांबीचा किंग कोब्रा अडकून असल्याचे निदर्शनास येताच ॲड. अमृत गावडे यांनी याची माहिती पाटणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांना दिली.

त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी दोन तासांहून अधिक वेळ शर्थीचे प्रयत्न किंग कोब्र्याला सुरक्षित पकडून जंगल अधिवासात सोडले. यावेळी रेमाण्णा गावडे, विक्रम कांबळे, आशिष पाटील व वनविभागाचे पथक उपस्थित होते.

Web Title: A ten foot long king cobra was found in Parle Chandgad Taluka Kolhapur District