शहरं
Join us  
Trending Stories
1
Dombivli MIDC Explosion डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
2
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय
3
मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण
4
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
5
Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जूनला होणार सेलिब्रेशन
6
सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास
7
१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान
8
पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?
9
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम
10
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
11
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता
12
पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम
13
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला
14
लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
15
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग
16
९ ठार! वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; रोहितची पत्नी भावूक, म्हणाली...
17
T20 WC 2024: टीम इंडिया आज तरी चूक सुधारणार? अमेरिकेविरूद्ध 'या' खेळाडूचा पत्ता कट?
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२४ : कौटुंबिक जीवनात आनंद राहील, नोकरीत पदोन्नती संभवते
19
T20 WC 2024 : न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून टीम इंडियाचे स्वागत; पाहा PHOTOS
20
रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया

ऊस दराची कोंडी फुटली!, शंभर रुपये द्यायची कारखान्यांची घोषणा, 'स्वाभिमानी'च्या लढ्याला यश

By विश्वास पाटील | Published: November 23, 2023 7:09 PM

विश्वास पाटील कोल्हापूर : गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी किमान ...

विश्वास पाटीलकोल्हापूर : गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी किमान टनास १०० रुपये व ज्यांनी तीन हजार रुपये दिले आहेत त्यांनी किमान आणखी ५० रुपये देण्यास कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस हंगामाची कोंडी गुरुवारी रात्री सात वाजता फुटली. यानंतर 'स्वाभिमानी'ने सकाळपासून सुरु असलेले पुणे-बेंगळुरु महामार्गावरील चक्काजाम आंदोलन ९ तासानंतर मागे घेतले.जिल्हा प्रशासन आणि संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासंदर्भात चर्चा झाली. मागील हंगामातील ४०० रुपये आणि चालू हंगामातील ऊसाला ३५०० रुपये एकरकमी पहिला हप्ता या मागणीसाठी संघटनेचे गेली २२ दिवस अत्यंत आक्रमक आंदोलन सुरु असल्याने साखर हंगाम ठप्प झाला आहे. ऊसदरासंदर्भात मुंबईत बुधवारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.त्यानंतर ४०० चा आग्रह सोडून देवून संघटनेने टनास किमान १०० रुपये घेतल्याशिवाय आंदोलनातून माघार नाही अशी भूमिका घेतली आणि तीन पाऊले मागे घेतली. एवढी रक्कम देण्याची कारखान्यांची तयारी आहे. ती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळीही दर्शवली होती. परंतू सत्ताधारी काही नेते मागील हंगामातील काय द्यायचे नाही, चालू हंगामातील पुढचे पुढे बघू अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे कारखानदार दबकून होते परंतू आता त्यांनी शंभर रुपये देवून कोंडी फोडली आहे.

पुणे-बेंगळुरु महामार्गावर चक्काजामआज, गुरुवारी सकाळपासून हजारो शेतक-यांनी पुणे-बेंगळुरु महामार्ग रोखून धरला होता. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दुपारी शेतकऱ्यांची महामार्गावरच जेवणाची पंगत बसली होती. दरम्यान, तोडगा काढण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज यांनी घटनास्थळी जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेतली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाcollectorजिल्हाधिकारीRaju Shettyराजू शेट्टी