युद्धजन्य परिस्थितीमुळे सीमेवर परतावे लागले, कोल्हापुरातील जवानाने मागितलेले गृहकर्ज तातडीने मिळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:36 IST2025-05-10T13:35:52+5:302025-05-10T13:36:14+5:30
कोल्हापूर : युद्धजन्य परिस्थितीमुळे सुटीवर आलेल्या जवानाला अचानक सीमेवर बोलावणे आल्यामुळे त्याला तातडीने कर्तव्यावर परतावे लागले. मात्र, या कालावधीत ...

युद्धजन्य परिस्थितीमुळे सीमेवर परतावे लागले, कोल्हापुरातील जवानाने मागितलेले गृहकर्ज तातडीने मिळाले
कोल्हापूर : युद्धजन्य परिस्थितीमुळे सुटीवर आलेल्या जवानाला अचानक सीमेवर बोलावणे आल्यामुळे त्याला तातडीने कर्तव्यावर परतावे लागले. मात्र, या कालावधीत त्याने घरासाठी मागितलेले कर्ज ४८ तासांत मंजूर करून बँक ऑफ इंडियाने सामाजिक भान जपले.
कोल्हापुरातील राजेश पाटील हे लष्करात सैनिक आहेत. ते अलीकडेच १५ दिवसांच्या सुटीवर घरी आले होते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांची ही सुट्टी अचानक रद्द झाली. या कालावधीत आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या अंबाबाई मंदिर शाखेशी संपर्क साधला. सामान्यतः गृहकर्ज कर्जदाराच्या सिबील रिपोर्टवर अवलंबून असतो शिवाय अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यातच वेळ जातो. मात्र, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे गृहकर्ज दोन दिवसांत मंजूर करून त्यांना तत्पर सेवा दिली.
पाटील यांना बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर पुनित द्विवेदी, डिव्हिजनल झोनल मॅनेजर विशालकुमार सिंग, आरबीसी चीफ मॅनेजर प्रदीप भुयान, अधिकारी शंतनू सुंबेकर, अंबाबाई मंदिर शाखेचे चीफ मॅनेजर ललितकुमार मेहरा, ॲड मॅनेजर संतोष गावडे तसेच जय मातादी असोसिएट्सचे राकेश शिर्के आणि नीलंबरी पाटील यांनी संवेदनशीलता दाखवून तातडीने कर्ज मंजूर केले.