शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षांबाबत सस्पेन्स, २६ जूनला होणार मतदान; कोण होणार लोकसभेचा स्पीकर
2
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
3
अजित डोवाल यांच्यावरच पंतप्रधान मोदींचा विश्वास; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून तिसरी टर्म
4
“२५० जागांवर तयारीचे राज ठाकरेंचे आदेश, स्वबळावर विधानसभा निवडणूक...”: बाळा नांदगावकर
5
ठाकरे गटात येण्यास सुषमा अंधारेंची साद; रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “चांगली संधी...”
6
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
7
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
8
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
9
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
10
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
11
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
12
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
13
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
14
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
15
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
16
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात
17
अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
18
PM Kisan Samman Nidhi : पुढच्य आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार पैसे, तारीखही ठरली!
19
"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
20
ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट 

एटीएम कार्डची अदलाबदल करुन घातला गंडा, बिहारी भामटा सोनुवर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल

By उद्धव गोडसे | Published: April 30, 2024 2:05 PM

कोल्हापूर : एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने हातचालाखी करून आणि एटीएम कार्डची आदलाबदल करून फसवणूक करणारा बिहारी भामटा सोनूकुमार ...

कोल्हापूर : एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने हातचालाखी करून आणि एटीएम कार्डची आदलाबदल करून फसवणूक करणारा बिहारी भामटा सोनूकुमार पचानंद सनगही (वय २८, रा. अमरपूर, बिहार) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.त्याने २२ मार्च रोजी अनिल गोपालराव सूर्यवंशी (वय ६४, रा. महाद्वार रोड, कोल्हापूर) यांची फसवणूक करून खात्यावरील एक लाख १० हजार रुपये लांबविले आहेत. आठवड्यापूर्वीच शाहूपुरीतील ट्रेझरी शाखेजवळील एटीएम सेंटरमध्ये एका व्यक्तीची फसवणूक करून त्याने दीड लाख रुपये लांबविले होते.अनिल सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पेटाळा येथील एका एटीएम सेंटरमध्ये ते त्यांच्या एटीएम कार्डचा पासवर्ड बदलण्यासाठी गेले होते. पासवर्ड बदलण्याची प्रकिया विसरल्याने ते गोंधळले होते. त्याचवेळी एटीएम सेंटरमध्ये आलेल्या तरुणाने मदत करण्याच्या बहाण्याने कार्डची आदलाबदल केली. त्यानंतर दोन दिवसांतच सूर्यवंशी यांच्या खात्यातून एक लाख १० हजार रुपये कमी झाले. मात्र, मोबाइलवरील मेसेज पाहिले नसल्याने त्यांना फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला नाही. आठवड्यापूर्वी शाहूपुरी येथील ट्रेझरी शाखेतील एटीएम सेंटरवर एटीएम कार्डची आदलाबदल करून झालेल्या फसवणुकीची बातमी त्यांच्या वाचनात आली. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन पासबूक भरून घेतल्यानंतर खात्यातील एक लाख १० हजार रुपये अज्ञाताने एटीएमद्वारे आणि ऑनलाइन खरेदीद्वारे काढल्याचे लक्षात आले. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताच संशयित भामटा हा शाहूपुरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी बिहारी भामटा सोनूकुमार याच्यावर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस