शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार फोन अन् मेसेज, केबिनमध्ये बोलावून प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीशी गैरवर्तन; कोल्हापुरात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:37 IST

प्राध्यापकास अटक, विनयभंगाचा गुन्हा दाखल

​गोकुळ शिरगाव: कोल्हापुरातील एका महाविद्यालयातप्राध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संताजनक घटना घडली. पीडित विद्यार्थिनीला वारंवार फोन अन् मेसेज करून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत गैरवर्तन केले. प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. ​याप्रकरणी प्राध्यापक सौरभ जोशी (रा. स्मृती अपार्टमेंट, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी शिक्षणासाठी कोल्हापुरात वास्तव्यास आहे. आरोपी सौरभ जोशी याने नोव्हेंबर २०२५ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत पीडितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्याने विद्यार्थिनीला वारंवार फोन आणि मेसेज करून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. केबिनमध्ये विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले.धक्कादायक बाब म्हणजे जोशी याने यापूर्वीही मुलींशी गैरवर्तन केल्याची परिसरात चर्चा सुरु होती. तो वसतिगृहात राहणाऱ्या मुलींशी अनेकदा अपमानास्पद भाषेत बोलत असे. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने काल, गुरुवारी (दि.७) पोलिसांत धाव घेतली.विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जोशीविरुद्ध विनयभंग, लैंगिक छळ आणि पाठलाग करणे यांसारखे गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर, गोकुळ शिरगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगवान केला आहे. ​आरोपी सौरभ जोशी याने विद्यार्थिनीला केलेले मेसेजेस आणि कॉल रेकॉर्ड्स तांत्रिक तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. प्राध्यापक जोशी निलंबित ​या घटनेनंतर महाविद्यालयाने विश्वस्त मंडळाची बैठक घेऊन प्राध्यापक जोशी यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. तर, विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता जोशी विरोधात तक्रार द्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Professor arrested for molesting student in Kolhapur college.

Web Summary : A professor in Kolhapur was arrested for sexually harassing a student by repeatedly calling and messaging her, then abusing her in his office. The college suspended the professor, urging students to report any misconduct.