अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी एकास अटक
By संदीप आडनाईक | Updated: November 6, 2022 22:36 IST2022-11-06T22:35:31+5:302022-11-06T22:36:37+5:30
कोल्हापुरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली होती.

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी एकास अटक
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अमन शकुर हकीम (वय २१, रा. राजेंद्रनगर) याला रविवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपीला सोमवार, दि. ७ रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. तपासात या मुलीचे अपहरण झाले असल्याचे समोर आले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तत्काळ या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिची सुटका केली. याप्रकरणी संशयित आरोपी अमन याला सांगली येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.