शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या व्यक्तीचा कोल्हापुरात धिंगाणा, शिरला नाल्यातील जलवाहिनीत; अग्निशमन जवानांची धावपळ, मांत्रिकाला बोलविले, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:39 IST

बाहेर काढण्यासाठी तासभर मोठी कसरत

कोल्हापूर : सोलापूरहून आलेल्या काही जणांपैकी एका व्यक्तीने बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास धिंगाणा घातल्याने महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली. ही व्यक्ती अनपेक्षितपणे तावडे हॉटेल चौकाजवळील नाल्यातील जलवाहिनीमध्ये शिरल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी तासभर मोठी कसरत करावी लागली.पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील काही व्यक्ती एका वाहनातून कोल्हापूरकडे येत होत्या. तावडे हॉटेलजवळ त्यांचे वाहन येताच त्यातील एका व्यक्तीने अचानक वाहनातून उडी मारली आणि रस्त्यावरून पळत सुटली. त्याने अंगावरील कपडे काढले, केवळ अंडरवेअरवर पळत सुटलेली ही व्यक्ती येथील एका ओढ्यात उतरली. पुढे ओढ्यातील जलवाहिनीत शिरली.या व्यक्तीसोबत आलेल्या अन्य सहकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला, पण ती व्यक्ती जलवाहिनीत शिरल्याने त्यांचाही नाइलाज झाला.

हा गोंधळ पाहून रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांनी त्याची माहिती अग्निशमन दलाला कळविली. अग्निशमन दलाची दोन वाहने, जवान तेथे पोहोचले. बॅटरीच्या उजेडात त्या व्यक्तीचा शोध घेतला. ती व्यक्ती साधारणपणे ५० ते ६० फूट आत जलवाहिनीत गेली होती. जवानांनी त्यास बाहेर येण्याची विनंती केली, पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. जलवाहिनीतून पाणी वाहत असल्याने जवानांना आत जाणेही अशक्य होते.

मांत्रिकाने केली कमालजवानांचे प्रयत्न सुरू असतानाच सोबत आलेल्या व्यक्तींनी एका मांत्रिकाला बोलविले. अग्निशमन जवानांनी जलवाहिनीच्या दुसऱ्या बाजूला जाळी लावली. त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच मांत्रिकाने त्या व्यक्तीच्या दिशेने काही लिंबू फेकले. तेव्हा ती व्यक्ती हळूहळू बाहेर आली. या अघोरी प्रयत्नाने अग्निशमनचे जवानही चकीत झाले. पहाटे पावणेचार वाजता त्या व्यक्तीला घेऊन त्याचे सहकारी निघून गेले.

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Man's Kolhapur Rampage: Entered Drain, Firefighters Called, Magician Arrived!

Web Summary : A man from Solapur caused chaos in Kolhapur, entering a drainpipe near Tawade Hotel. Firefighters struggled for an hour to extract him. A magician was summoned, and after throwing lemons, the man emerged, leaving firefighters astonished.