शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तिकीटाची विचारणा केल्याने रेल्वेत चाकूहल्ला; कर्मचारी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 12:37 IST

जखमींवर बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

बेळगाव : धावत्या रेल्वेत तिकिटाची विचारणा करणाऱ्या तिकीट तपासणीसासह दोघांवर प्रवाशाने धारदार चाकूने हल्ला केला. त्यात एका कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले. ही घटना लोंढा ते गुंजीदरम्यान गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास झाली. ठार झालेल्या रेल्वे कर्मचारी युवकाचे नाव देवर्षी (वय २२, रा. झांशी) असे आहे.तो रेल्वेमध्ये प्रवाशांना बेडरोल कर्मचारी म्हणून कंत्राटी पद्धतीवर कामाला होता. जखमींमध्ये तिकीट तपासनीस अश्रफ कित्तूर् आणि कंत्राटी रेल्वे कर्मचारी शोएब शेख यांचा समावेश आहे. जखमींवर बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.रेल्वे तिकीट तपासनीस अश्रफ कित्तूर हे दुपारी हुबळीहून पाँडेचेरीला निघालेल्या रेल्वे क्र. ११००६ मध्ये नेहमीप्रमाणे तिकीट तपासण्याचे काम करत होते. यावेळी लोंढा ते गुंजीदरम्यान स्लीपर क्लासमध्ये तपासणी करताना त्यांनी दरवाजाजवळ थांबलेल्या सात-आठ प्रवाशांना तिकिटाची विचारणा केली. त्यांच्यापैकी चौघा जणांकडे तिकीट नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर अश्रफ यांनी त्यांना दंड ठोठावला. त्यानंतर दरवाजाजवळ थांबलेल्या प्रवाशाकडे तिकिटाची विचारणा केली. त्यावेळी मला तिकीट विचारतोस का, असा जाब विचारून त्या प्रवाशाने अश्रफ यांच्यावर अचानक चाकूने हल्ला चढवला. चाकू पोटाला लागणार हे लक्षात येताच क्षणार्धात प्रसंगावधान राखून अश्रफ मागे सरकले. मात्र, तरीही त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाला चाकूचा वार झाला. अश्रफ यांच्याजवळ थांबलेला बेडरोल कर्मचारी देवर्षी हा तिकीट तपासणी साहेबांचा माणूस आहे, असे समजून त्या हल्लेखोर प्रवाशाने थेट देवर्षी याच्या छातीत चाकू खुपसला. त्यामुळे देवर्षी रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच गतप्राण झाला. दरम्यान, हल्लेखोर प्रवाशाने रेल्वेतून उडी टाकून घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून, पोलिस हल्लेखोर प्रवाशाचा शोध घेत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटकrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू