शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur news: अधुरी एक कहाणी... लग्नानंतर ४५ व्या दिवशी अपघातात नवविवाहितेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 19:37 IST

नवविवाहितेच्या अपघाती मृत्यूने ऐनापूरकर हळहळले

राम मगदूमगडहिंग्लज : लग्नानंतर अवघ्या ४५ दिवसात बेळगाव येथील अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या नवविवाहितेचा मृत्यू झाला. स्वाती विकास पाटील (वय २५, रा. ऐनापूर, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे ऐनापूरसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.ऐनापूर येथील विकास जरीगोंडा पाटील व स्वाती आण्णासाहेब माने हे दोघेही एकमेकांच्या नात्यातील आहेत. अभियांत्रिकी पदविका घेतलेला विकास गडहिंग्लजमध्ये मोबाइल शॉपी चालवतो. वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी घेतलेली स्वाती येथील श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीमध्ये नोकरीला होती.काही वर्षांपासून दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु, काही कारणांमुळे लग्न लांबणीवर पडत होते. त्यामुळे स्वातीची बहीण स्मिता, भाऊजी सचिन खपले आणि विकासचा भाऊ शिवराज यांनी पुढाकार घेतला. २ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह पार पडला.बुधवारी (१४) बैलहोंगल व संपगाव येथील स्वातीच्या मावशीला भेटून दोघेही दुचाकीने देवगिरी येथील आजोळी जात होते. दरम्यान, बेळगावनजीक भरधाव कारगाडीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात विकासलाही दुखापत झाली आहे.दुचाकीवरून रस्त्यावर जोरात आपटल्याने स्वातीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिला प्रथम केएलई व नंतर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तिच्या पश्चात पती, सासू, सासरा, दीर, आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे.अधुरी एक कहाणी...स्वातीचे माहेर व सासर ऐनापुरातच आहे. त्यामुळे स्वाती लग्नाआधीही प्रत्येक सणावाराला विकासच्या घरी जाऊन आईला (सासू) स्वयंपाकासह घरकामात मदत करत असे. गावातील महादेव मंदिरात कोणताही कार्यक्रम असला तरी आजूबाजूच्या महिलांना घेऊन रांगोळी काढायला ती नेहमीच पुढे असायची. स्वाती अत्यंत मनमिळावू व जिद्दी होती. मुख्यमंत्री कौशल्यविकास योजनेतील प्रशिक्षणानंतर ‘रवळनाथ’मध्ये तिला कायमची नोकरी मिळाली होती. मात्र, संसार फुलण्याआधीच तिला काळाने हिरावून नेले. त्यामुळे पाटील व माने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Newlywed Dies in Accident 45 Days After Marriage

Web Summary : A newly married woman from Ainapur, Swati Patil, tragically died in an accident near Belgaum just 45 days after her wedding. The accident also injured her husband. Swati was known for her helpful nature and community involvement. The untimely death has cast a pall of gloom over the region.