शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटून इथेनॉलच्या टँकरला भीषण आग, गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:57 IST

अग्निशमनच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला  

कोल्हापूर : कोल्हापूर - गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर साळवणनजीक असणाऱ्या वळणावर कागलच्या शाहू कारखान्यातून इथेनॉल भरून गोव्याच्या दिशेने निघालेल्या टँकरला टायर फुटून घर्षणाने भीषण आग लागली. ही घटना मंगळवारी (दि. १०) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा टँकर ४० हजार लिटर इथेनॉल भरून गोव्याच्या दिशेने निघाला होता. साळवण-मार्गेवाडीनजीक टायर फुटल्याने प्रचंड घर्षणाने ठिणगी पडून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अल्पावधीत आगीने रौद्ररूप धारण केल्याने धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले होते. यामुळे प्रारंभी स्फोट होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.कोल्हापूर येथील मार्केट यार्ड, अग्निशमन दल तसेच छत्रपती शाहू साखर कारखान्याची अग्निशमन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.दरम्यान, आग नियंत्रणात आल्यानंतर टँकरमधून इथेनॉलची गळती सुरू झाल्याने धोका कायम असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर - गगनबावडा मार्गावरील वाहतूक वेतवडे - अणदूरमार्गे वळविण्यात आली आहे.घटनेची माहिती मिळताच गगनबावडा व कळे पोलिस ठाण्याचे अधिकारी, तहसीलदार रूपाली सूर्यवंशी, छत्रपती शाहू साखर कारखान्याचे डिस्टिलरी मॅनेजर नितीन पाटील तसेच अग्निशमन विभागाचे जयवंत खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.चालकाचे प्रसंगावधानआग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टँकर तत्काळ रस्त्याच्या कडेला उभा केला आणि १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून अग्निशमन दलाला पाचारण केले. वेळेत अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले.अजूनही धोका कायमआग आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशमन दलास यश आले असले तरी अखेरच्या क्षणी इथेनॉलची गळती चालू झाल्याने अद्यापही धोका कायम असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक वेतवडे-अणदूरमार्गे वळविण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत टँकरमधील इथेनॉल दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षित हलविण्याचे काम चालू होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ethanol Tanker Fire on Kolhapur-Gaganbawda Road After Tire Burst

Web Summary : A tanker carrying ethanol caught fire near Kolhapur after a tire burst. Firefighters controlled the blaze after two hours. Ethanol leakage prompted road closure and traffic diversions. No casualties were reported; driver's quick action averted disaster.