शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’मध्ये नेत्यांच्यात रंगली जुगलबंदी; भविष्यातही माझी गरज, सतेज पाटलांनी चिमटा काढला, मुश्रीफ म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:29 IST

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकालादिवशीच एकमेकांच्या विरोधात प्रतिष्ठापणाला लागलेले नेते एकाच व्यासपीठावर

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या नवीन जनरेटरचे उद्घाटन झाले, नारळ सर्वांनी फोडला, पण जनरेटर सुरू करण्याचे बटन दाबण्याचा मान मात्र मलाच मिळाला. म्हणजे जनरेटर चालू करणारा मीच आहे, त्यामुळे पुढेही मी तुम्हाला लागणारच, असा मिश्किल चिमटा काॅंग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी काढला. तर महापालिकेच्या निवडणुकीत सतेज पाटील (बंटी) व आपल्यामध्ये संघर्ष झाला, आता त्यांनी संघर्ष न करता आमच्यासोबत यावे, अशी गुगली वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी टाकली.‘गोकुळ’ दूध संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांची १२ वी पुण्यतिथी व २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केल्याबद्दल कलश पूजन समारंभ शुक्रवारी संघाच्या गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्पावर झाला. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली.पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘राजकारणात आपल्या भूमिका वेगवेगळ्या असतील, पण ‘गोकुळ’मध्ये आम्ही सर्वजण एकत्र आहोत. ‘गोकुळ’ ही कोल्हापूरची ओळख असून, शेतकऱ्यांचे हित जपणे हेच आपले सामूहिक ध्येय आहे.’मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘गोकुळ’मध्ये आम्ही सर्वजण शेतकरी हितासाठी एकत्र आलो आहोत. शरीराने सगळे येथे उपस्थित असलो तरी मनाने सध्या सगळ्यांचे लक्ष महानगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे. तिथे आम्ही आणि बंटी पाटील यांनी संघर्ष केला आहे. आता बंटी पाटील यांनी संघर्ष न करता आमच्यासमवेत यावे.’ ‘ठीक आहे, पण पालकमंत्री प्रकाश आबिटकर व के. पी. पाटील यांचे काय ते सांगा’, अशी सतेज पाटील यांनी विचारणा केल्यानंतर व्यासपीठावर एकच हशा पिकला.‘गोकुळ’च्या दुधाचा पांढराच रंगसंघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर हे नेहमी सांगायचे, शेतकरी हाच माझा पक्ष आहे. दुधामध्ये कुठलाही भेदभाव नसतो. सर्व दूध पांढरेच असते, त्यामुळे भविष्यात ‘गोकुळ’च्या दुधाचा रंगही पांढराच राहील. २५ लाख लिटरच्या कलश पूजनाचा कार्यक्रम आपणा सर्वांच्या हस्ते व्हावा आणि त्यावेळीही आम्ही उपस्थित असावे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Political banter at Gokul inauguration; Patil takes a dig at Mushrif.

Web Summary : At Gokul's event, Satej Patil hinted at his continued relevance. Hasan Mushrif invited Patil to join them, sparking laughter regarding future alliances with other leaders. Focus remains on farmer welfare.