कोल्हापूर: सीपीआर रुग्णालय, सर्किट बेंचसमोर भाऊसिंगजी रोडवर जुनं भले मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत दोघेजण जखमी झालेत. तर दोन दुचाकीचं मोठे नुकसान झाले आहे. संरक्षण भिंतीच्या खोदकाम सुरु आहे. या खोदकामामुळे झाडाची मुळं उघडी पडल्याने हे झाड कोसळलं असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. सीपीआर रुग्णालयासमोरचे हे झाड खंडपीठाच्या कंपाउंडवर पडले. त्यामुळे संरक्षक कंपाउंडचं नुकसान झाले. अचानक झाड कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. सीपीआर रुग्णालय, सर्किट बेंचमुळे या परिसरात मोठी वर्दळ असते. या घटनेमुळे नागरिकांसाठी हा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण होता. घटना घडल्यानंतर सिपीआर रुग्णालयाचे सुरक्षारक्षक, पोलीस आणि महापालिका कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. झाडे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
Web Summary : A large, old tree fell near Kolhapur's Circuit Bench and CPR Hospital due to exposed roots from nearby construction. Two people were injured, and two vehicles were damaged. The incident caused traffic disruption and panic in the busy area.
Web Summary : कोल्हापुर सर्किट बेंच और सीपीआर अस्पताल के पास निर्माण के कारण जड़े खुलने से एक विशाल पेड़ गिर गया। दो लोग घायल हो गए, और दो वाहन क्षतिग्रस्त हो गए। घटना से व्यस्त इलाके में यातायात बाधित हो गया और दहशत फैल गई।