Kolhapur: लग्न होऊन सहा वर्षे झाली, मूलबाळ नाही; नैराश्येतून ग्रामसेविकीने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:22 IST2024-01-29T16:18:23+5:302024-01-29T16:22:49+5:30

कुरुंदवाड : लग्न होऊन सहा वर्षे झाली, तरी मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्येतून टाकळीवाडी (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अनघा सतीश ...

A gramsevika ended her life as she could not have children in Kurundwad kolhapur | Kolhapur: लग्न होऊन सहा वर्षे झाली, मूलबाळ नाही; नैराश्येतून ग्रामसेविकीने संपवले जीवन

Kolhapur: लग्न होऊन सहा वर्षे झाली, मूलबाळ नाही; नैराश्येतून ग्रामसेविकीने संपवले जीवन

कुरुंदवाड : लग्न होऊन सहा वर्षे झाली, तरी मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्येतून टाकळीवाडी (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अनघा सतीश बदामे (वय २७, रा. लक्ष्मी टेक, तेरवाड) यांनी तेरवाड येथील राहत्या घरी लोखंडी तुळईस नायलाॅनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची वर्दी सचिन तुकाराम सावगावे यानी कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामसेविका बदामे टाकळीवाडी ग्रामपंचायतीत सेवेत होत्या. २०१८ साली त्यांचे लग्न झाले होते. लग्न होऊन सहा वर्षे उलटली, तरी मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे वर्दीत म्हटले आहे. दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.

Web Title: A gramsevika ended her life as she could not have children in Kurundwad kolhapur