अंबाबाईच्या गाभाऱ्याला पाच किलो चांदीचे तोरण, पुण्यातील भक्ताने केले अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 11:52 IST2023-07-20T11:51:57+5:302023-07-20T11:52:26+5:30

तोरणाची किंमत चार लाख ९४ हजार १८८ इतकी

A five kg silver pylon for Ambabai core, A devotee from Pune made an offering | अंबाबाईच्या गाभाऱ्याला पाच किलो चांदीचे तोरण, पुण्यातील भक्ताने केले अर्पण

अंबाबाईच्या गाभाऱ्याला पाच किलो चांदीचे तोरण, पुण्यातील भक्ताने केले अर्पण

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याला नव्या चांदीच्या तोरणाची झळाळी लाभली आहे. पुण्यातील देवीचंद अग्रवाल या भक्ताने बुधवारी पाच किलो ८३२ ग्रॅमचे चांदीचे तोरण अर्पण केले आहे. या तोरणाची किंमत चार लाख ९४ हजार १८८ इतकी आहे.

देवीच्या गाभाऱ्याला यापूर्वीही चांदीचे तोरण होते; पण ते लहान आणि जुने झाले होते. नवे तोरण तुलनेने मोठे व आकर्षक डिझाइनचे आहे. देवीचंद अग्रवाल हे अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. अधिक महिन्याचे औचित्य साधून त्यांनी मंदिरासाठी हे तोरण अर्पण केले.

Web Title: A five kg silver pylon for Ambabai core, A devotee from Pune made an offering