शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur news: महाविद्यालयीन तरुणीचा कारनामा, गर्दीचा फायदा घेत बसमध्ये करायची चोऱ्या; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 16:06 IST

तिच्याकडून चोरीतील दागिने आणि रोकड असा एक लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

उद्धव गोडसे

कोल्हापूर : बसमध्ये चढणा-या प्रवाशांच्या गर्दीत शिरून महिलांच्या पर्समधील दागिने आणि रोख रक्कम लंपास करणा-या एका महाविद्यालयीन तरुणीस लक्ष्मीपुरी पोलिसांनी काल, बुधवारी (दि. १८) अटक केली. प्रज्ञा उर्फ प्रतीक्षा दगडू निंबाळकर (वय २२, मूळ रा. बोरीवडे, ता. पन्हाळा, सध्या रा. बोंद्रेनगर, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे.लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा गुन्हे केल्याची तिने कबुली दिली आहे. यापूर्वी मुंबई आणि पुण्यातही तिने चोरीचे गुन्हे केले आहेत. पोलिसांनी तिच्याकडून चोरीतील दागिने आणि रोकड असा एक लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.गेल्या तीन-चार महिन्यांपासून शहरात केएमटी बसमध्ये चढताना पर्सचोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी आणि चोरट्यांचा शोध घेण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांची संशयितांवर नजर होती. छत्रपती शिवाजी चौकातील बस स्टॉपवर संशयास्पद हालचाली करणारी प्रज्ञा उर्फ प्रतीक्षा निंबाळकर या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, तिने पर्सचोरीची कबुली दिली. पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, पोलिस उपनिरीक्षक इकबाल महात यांच्यासह रणजीत देसाई, रोहित मर्दाने, प्रतीक शिंदे, संजय कोळी, सुहास पाटील, संदीप कुंभार, वृंदा इनामदार, अश्विनी अतिग्रे आदींनी ही कारवाई केली. अटकेतील तरुणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत चोरटी असून, तिच्याकडून चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीWomenमहिलाPoliceपोलिस