Accident: देवदर्शनाला जाताना हुक्केरी जवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू, तीघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 19:37 IST2022-03-25T19:17:16+5:302022-03-25T19:37:14+5:30
सौंदत्ती येथे देवदर्शनाला निघालेल्या मुरगुड येथील भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला.

Accident: देवदर्शनाला जाताना हुक्केरी जवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू, तीघे गंभीर जखमी
मुरगूड : सौंदत्ती येथे देवदर्शनाला निघालेल्या मुरगुड येथील भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. कार समोर आलेल्या कुत्र्याला चुकवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन आदळली. या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले. हुक्केरी जवळ हा भीषण अपघात झाला.
यात संजय जयसिंग चौगले (वय ५७ ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी तिघांवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद हुक्केरी पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे.
अधिक माहिती अशी की, मुरगूड येथील सेवानिवृत्त पशु वैद्यकीय अधिकारी संजय जयसिंग चौगले, त्यांच्या पत्नी सविता चौगले, नातलग विजया सदाशिव सूर्यवंश-पाटील व अनिल ज्ञानदेव गुजर हे चौघे चौगले यांच्या खासगी गाडीतून (गाडी नंबर MH ०९ CM 5822 ) सौंदत्ती येथे देवदर्शनाला निघाले होते. सकाळी सहा वाजता ते मुरगूड मधून बाहेर पडले. आठ ते नऊ च्या सुमारास हुक्केरी जवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. यावेळी कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर आदळून वीस ते पंचवीस फूट बाजूला तीन ते चार वेळा पलटी झाली. यात गाडीचा चक्काचुरा झाला.
अपघातानंतर तेथील नागरिकांनी तात्काळ जखमींना हुक्केरी येथील रुग्णालयात दाखल केले. दोन्ही महिलांनी आपला पत्ता सांगितल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क झाला. दरम्यान उपचारा पूर्वीच चौगले यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुरगूडमधून नातवाईक हुक्केरीमध्ये पोहचल्यानंतर जखमींना तात्काळ कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.