Kolhapur News: म्हैस बिथरली, थेट घराच्या टेरेसवर गेली; आठवडी बाजारात उडाली एकच धांदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:49 IST2026-03-10T15:48:07+5:302026-03-10T15:49:19+5:30

सोलर पॅनल तसेच फुलांच्या कुंड्यांची मोडतोड

A buffalo that was stranded in Murgud Kolhapur went straight to the terrace of a house | Kolhapur News: म्हैस बिथरली, थेट घराच्या टेरेसवर गेली; आठवडी बाजारात उडाली एकच धांदल

Kolhapur News: म्हैस बिथरली, थेट घराच्या टेरेसवर गेली; आठवडी बाजारात उडाली एकच धांदल

मुरगूड : मुरगूड येथील आठवडी बाजारासाठी आणण्यात आलेली एक म्हैस अचानक बिथरल्याने बाजारपेठेत काही काळ एकच धांदल उडाली. बिथरलेली म्हैस बाजारपेठेतील नामदेव भाट यांच्या बोळातून धावत जाऊन थेट पायऱ्या चढत सुहास चौगुले यांच्या घराच्या टेरेसवर पोहोचली. यात सोलर पॅनल तसेच फुलांच्या कुंड्यांची मोडतोड झाली. आठवडी बाजार असल्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होती. याघटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

ही म्हैस तेजस मोरे यांच्या मालकीची असल्याचे समजते. दरम्यान, म्हैस टेरेसवर गेल्याची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. संतोष सोनुले या धाडसी तरुणाने पुढाकार घेत म्हशीला शांत करण्याचे धाडस केले. त्याला सतीश साळोखे, तेजस सोनुले, सोमनाथ यरनाळकर, आकाश भाट आणि राहुल पाटील या तरुणांनीही मदत केली.

या सर्वांनी मोठ्या प्रयत्नांनंतर बिथरलेल्या म्हशीला शांत करत सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला. त्यांच्या धाडसाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

Web Title : भैंस हुई बेकाबू, घर की छत पर चढ़ी; कोल्हापुर बाजार में मची अफरा-तफरी।

Web Summary : मुरगुड के बाजार में एक बेकाबू भैंस ने आतंक मचाया, जो एक घर की छत पर चढ़ गई और संपत्ति को नुकसान पहुंचाया। बहादुर स्थानीय लोगों ने जानवर को शांत किया और सुरक्षित रूप से नीचे उतारा, जिससे संभावित आपदा टल गई। उनके साहस की व्यापक रूप से सराहना की गई।

Web Title : Buffalo panics, climbs house terrace; chaos in Kolhapur market.

Web Summary : A panicked buffalo caused chaos in Murugud's market, running onto a house terrace and damaging property. Brave locals calmed the animal and brought it down safely, averting potential disaster. Their courage was widely praised.