शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: क्षणिक डुलकी जिवावर उलटली, पहाटे कार ट्रकवर आदळली; एअरबँग उघडूनही दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:45 IST

एसीबीच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारला भीषण अपघात, लांबचा प्रवास असल्याने दोन चालक तरीही..

कोल्हापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) उपअधीक्षक वैष्णवी सुरेश पाटील ( वय ४०, रा. कळंबा रोड, कोल्हापूर, मूळ रा.चंद्रे, ता.राधानगरी) यांच्या कारला कर्नाटकातील चित्रदुर्ग ते कलबुर्गी महामार्गावर भीषण अपघात झाला. रविवारी (दि. ११) पहाटे चारच्या सुमारास झालेल्या अपघातात पाटील यांच्या आई कमल हरिभाऊ पाटील (वय ६९, रा. कांदे, ता. शिराळा, जि. सांगली) आणि कार चालक राकेश अर्जुन आयवाळे (३९, रा. निपाणी, जि. बेळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात उपअधीक्षक पाटील यांच्यासह त्यांच्या चुलती कुसुम प्रल्हाद पाटील (५७, रा. कांदे) आणि एसीबीचे कॉन्स्टेबल उदय दत्तात्रय पाटील (रा. कौलव, ता. राधानगरी) हे गंभीर जखमी झाले. रामेश्वर येथील देवदर्शन घेऊन परत येताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती चित्रदुर्ग येथील पोलिस उपअधीक्षक दिनकर पी. के. यांनी दिली.उपअधीक्षक वैष्णवी पाटील या त्यांच्या आई आणि चुलतीला देवदर्शन घडविण्यासाठी स्वत:च्या कारने दक्षिण भारतात गेल्या होत्या. कार्यालयातील कॉन्स्टेबल उदय पाटील यांना सोबत घेऊन त्या गुरुवारी कोल्हापुरातून बाहेर पडल्या होत्या. शनिवारी सायंकाळी रामेश्वर येथील देवदर्शन आटोपून ते परतीच्या मार्गाला लागले. रविवारी पहाटे चारच्या सुमारास कर्नाटकातील चित्रदुर्ग ते कलबुर्गी महामार्गावर तमताकल्लू गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार समोरच्या ट्रकवर आदळली.भीषण अपघातात चालक राकेश आयवाळे आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या कमल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मागच्या सीटवर बसलेल्या उपअधीक्षक पाटील यांच्यासह त्यांच्या चुलती आणि कॉन्स्टेबल उदय पाटील जखमी झाले. चित्रदुर्ग पोलिसांनी तातडीने जखमींना चित्रदुर्ग येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.अपघाताची माहिती मिळताच पाटील कुटुंबीयांनी चित्रदुर्गकडे धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी कोल्हापूरकडे हलवण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. उपअधीक्षक पाटील यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. रात्रभर कार चालवल्याने पहाटेच्या सुमारास चालकाच्या डोळ्यावर झापड येऊन अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज चित्रदुर्ग पोलिसांनी वर्तवला आहे.देवदर्शनासाठी आल्या अन् दुर्घटना घडलीउपअधीक्षक पाटील यांनी आई आणि चुलतीला देवदर्शनासाठी बोलावले होते. आनंदात सर्वजण देवदर्शनासाठी गेले होते. रविवारी सकाळपर्यंत ते कोल्हापुरात पोहोचणार होते. तत्पूर्वीच कोल्हापूरपासून ४०० किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघाताने दोघांचा बळी घेतला. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. विशेष म्हणजे समोरच्या दोन्ही एअरबॅग उघडूनही दोघांचा मृत्यू झाला. त्यावरून अपघाताची भीषणता स्पष्ट होते.लांबचा प्रवास असल्याने दोन चालक तरीही..प्रवास लांबचा आहे. चालकाला विश्रांती मिळावी यासाठी उपअधीक्षक पाटील यांनी सोबत दोन चालकांना नेले होते तरीही अपघात चुकला नाही. त्यात एका चालकाचा मृत्यू झाला, तर दुसरा कौलवचा चालक जखमी झाला. क्षणिक डुलकी दोघांच्या जिवावर बेतली तर वैष्णवी पाटील यांच्यासह कारमधील अन्य तिघेजण जखमी झाले.गाडीचा अक्षरशः चेंदामेंदाउपअधीक्षक पाटील यांनी आई आणि चुलतीला देवदर्शनासाठी बोलावले होते. आनंदात सर्वजण देवदर्शनासाठी गेले होते. रविवारी सकाळपर्यंत ते कोल्हापुरात पोहोचणार होते. तत्पूर्वीच कोल्हापूरपासून ४०० किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघाताने दोघांचा बळी घेतला. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. विशेष म्हणजे समोरच्या दोन्ही एअरबॅग उघडूनही दोघांचा मृत्यू झाला.

यरनाळ गावावर शोककळाअपघातात जागीच ठार झालेला चालक राकेश अर्जुन ऐवाळे (वय ३९ रा. यरनाळ, ता. निपाणी) हा गेल्या आठ वर्षांपासून उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारवर चालक म्हणून काम करत होता. ते चार दिवसापूर्वी वैष्णवी पाटील यांच्या कुटुंबीयांसमवेत देवदर्शनासाठी दक्षिण भारतात गेले होते. परत येताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन जुळी मुले, आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांचे वडील अर्जुन ऐवाळे हे निवृत्त शिक्षक आहेत. अपघातात आपल्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला.

जखमी वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिरअपघाताची माहिती मिळताच पाटील कुटुंबीयांनी चित्रदुर्गकडे धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना उपचारासाठी कोल्हापूरकडे हलवण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. उपअधीक्षक पाटील यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रात्रभर कार चालवल्याने पहाटे चालकाच्या डोळ्यावर झापड येऊन अपघात झाला असावा, असा अंदाज चित्रदुर्ग पोलिसांनी वर्तविला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Fatal Nap Leads to Deadly Car-Truck Collision; Two Dead

Web Summary : A pre-dawn car accident on the Chitradurga-Kalaburagi highway claimed two lives, including the mother of ACB Deputy Superintendent Vaishnavi Patil. Patil and two others were injured when their car collided with a truck; a momentary lapse by the driver is suspected.