शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Kolhapur: शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष, इचलकरंजीच्या डॉक्टरला ९३ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:13 IST

इचलकरंजी : शेअर गुंतवणुकीतून जादा परतावा मिळवून देण्याबरोबरच नफ्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरची ९३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक ...

इचलकरंजी : शेअर गुंतवणुकीतून जादा परतावा मिळवून देण्याबरोबरच नफ्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरची ९३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ॲक्सिस स्टॉक एक्स्चेंज कंपनी कस्टमर केअर, केर्सी तावडिया व असिस्टंट राशी अरोरा या तिघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत डॉ. दशावतार गोपाळकृष्ण बडे (वय ५६, रा. गुलगुंजे गल्ली, जवाहरनगर) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, डॉ. बडे हे वैद्यकीय व्यवसाय करतात. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात बडे यांना इन्स्ट्राग्रामवरून माहिती मिळाली. इन्स्ट्राग्रामवरील गुंतवणुकीची लिंक त्यांनी डाउनलोड करून घेतली. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तींसोबत व्हॉटस्ॲप ग्रुपवरून संदेशाची देवाणघेवाण झाली. १५०० रुपयांप्रमाणे पाच वेळा त्यांनी रक्कमही गुंतवली. त्यानंतर त्यांचे शेअर मार्केटसंदर्भातील खाते उघडले गेले. त्या खात्यावर काही रक्कमही त्यांनी गुंतवली. त्यानंतर त्यांच्या शेअर मार्केटच्या खात्यावरील नफ्याची रक्कम वाढत गेली.दरम्यान, संशयित आरोपींनी बडे यांचा विश्वास संपादन केला. आयपीओमध्ये गुंतवणूक करावी. ९१ ते २५१ टक्के लाभ मिळवून देऊ, असे आमिष त्यांनी दाखवले. त्याप्रमाणे डॉ. बडे यांनी १३ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेगवेगळ्या खात्यात ९३ लाख ३५ हजार रुपये भरले. त्यानंतर त्यांच्या शेअर मार्केटच्या खात्यावर चार कोटी रुपये जमा झाल्याचे दिसले. ही रक्कम काढता येते का, अशी विचारणा डॉ. बडे यांनी वेळोवेळी केली. रक्कम काढायची असेल, तर पुन्हा ६५ लाख रुपये भरावे लागतील, असे त्यांना सांगण्यात आले. यावरून बडे यांना संशय आला आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.डॉ. बडे यांनी कंपनीच्या व्हॉटस्ॲपग्रुपच्या ॲडमिनसह तिघांनी संगनमताने ९३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन पाटील करीत आहेत.

सायबरकडून माहिती घेणे सुरूफसवणूक केलेली रक्कम मोठी आहे. ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केल्याने सायबर विभागाकडून संबंधित कंपनीची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतरच संबंधित कंपनी, संशयित आरोपी कुठले आहेत, हे समजणार आहे.

दोन महिन्यांत तिसरा प्रकारदोन महिन्यांपूर्वी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर ज्यादा परताव्याची आमिष दाखवत बनावट ॲपद्वारे कबनूर (ता.हातकणंगले) येथील एकाची ४९ लाख रुपयांची फसणूक झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर एका बाप-लेकाला कार खरेदी आणि जागा खरेदी यामध्येही फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. त्या पाठोपाठ डॉक्टरची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस