शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Kolhapur: गेल्या विधानसभा निवडणुकीत झाले होते ९२ गुन्हे दाखल; निर्दोष, किती गुन्ह्यांमध्ये झाली शिक्षा..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 14:23 IST

कोल्हापूर : २०१९ मधील विधानसभा निवडणुकीशी संबंधित एकूण ९२ गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यातील आठ गुन्ह्यांमधील संशयितांना शिक्षा ...

कोल्हापूर : २०१९ मधील विधानसभा निवडणुकीशी संबंधित एकूण ९२ गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यातील आठ गुन्ह्यांमधील संशयितांना शिक्षा झाली, तर दहा गुन्ह्यांतील आरोपी निर्दोष सुटले. अजूनही ७४ गुन्ह्यांचे खटले न्यायालयात प्रलंबित असल्याने संशयितांना हेलपाटे मारावे लागत आहेत. यंदाही आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, अशा सूचना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत.जिल्ह्यात सर्व निवडणुका अतिशय चुरशीने लढल्या जातात. तुल्यबळ गट आणि उमेदवारांमुळे संघर्षाचे प्रसंग उद्भवतात. अशावेळी गैरप्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. निवडणूक प्रक्रियेत अनुचित प्रकार घडू नयेत. बेकायदेशीर दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री होऊ नये. सराईत गुन्हेगारांचा वापर करून दहशत माजवू नये. उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांनी मतदारांवर बळाचा वापर करू नये. दोन गटांत संघर्ष होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. तरीही काही अनुचित प्रकार घडतातच.गेल्या विधानसभा निवडणूक काळात निवडणुकीशी संबंधित एकूण ९२ गुन्हे दाखल झाले. यातील ३९ गुन्हे आचारसंहिता भंगाचे होते. मारामारी, दमदाटी, दोन गटांतील वाद, अपहरण, बदनामीचा प्रयत्न अशा प्रकारचे ३८ गुन्हे दाखल होते. तर १५ गुन्हे अदखलपात्र होते. दहा गुन्ह्यांमधील आरोपी निर्दोष सुटले, तर आठ गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा आणि दंड झाला. उर्वरित ७४ गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत.

१६५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईनिवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करण्याचा धोका असलेल्या १६५ जणांवर पोलिसांनी २०१९ मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. बंधपत्र लिहून घेणे, चांगल्या वर्तनाचे हमीपत्र घेणे, पोलिस ठाण्यात हजेरी लावणे, तात्पुरती हद्दपारी अशा कारवाया करून संशयितांवर नियंत्रण ठेवले होते.

यंदाही ठोस ॲक्शन प्लॅनयेणारी विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी ४०० हून अधिक सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. त्यांना नोटिसा पाठवून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. कोम्बिंग ऑपरेशन, सराईतांच्या घरांची झडती, अवैध शस्त्रांचा शोध घेणे, तसेच अवैध व्यवसाय बंद केले जात आहेत.

निवडणुकीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये कोणतीही तडजोड होत नाही. संशयितांना वर्षानुवर्षे न्यायालयात खेटे मारावे लागतात. त्यामुळे असे गुन्हे घडूच नयेत, यासाठी खबरदारी घेणे हिताचे ठरते. - रवींद्र कळमकर, निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक 2024Crime Newsगुन्हेगारी