शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

सराफ संघासाठी ९० टक्के मतदान:

By admin | Updated: October 10, 2014 00:28 IST

चुरस : शांततेत, पण ईर्ष्येने मतदान; आज दुपारपर्यंत गुलाल

कोल्हापूर : एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांवरून गाजत असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघासाठी आज, गुरुवारी शांततेत पण ईर्ष्येने ९० टक्के मतदान झाले. ५८० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या, शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. संघाच्या महाद्वार रोडवरील कार्यालयाच्या हॉलमध्ये सहा बूथवर मतदानाची सोय करण्यात आली होती. आज सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली. अध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी भगवा, उपाध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी पिवळ्या आणि संचालकपदाच्या उमेदवारांसाठी पांढऱ्या रंगाच्या व्होटिंग स्लिप ठेवण्यात आल्या होत्या. मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावावर शिक्का मारून ही स्लिप ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये टाकायची होती. दुपारी बारा वाजेपर्यंत चाळीस टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत ५८० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. संघाचे एकूण सातशे सभासद आहेत. त्यांपैकी ६५५ सभासदांना मतदानाचा अधिकार आहे. सत्तरजणांनी मतदानाकडे पाठ फिरविली. सराफ संघाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड, विद्यमान उपाध्यक्ष संजय खद्रे आहेत. उपाध्यक्षपदासाठी हितेश ओसवाल, गणपतसिंह देवल, राजेश राठोड हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. संचालकपदाच्या बारा जागांसाठी सुरेश ओसवाल, धर्मपाल जिरगे, शिवराज पोवार, हिंदुराव शेळके, नमित गांधी, सुशीलकुमार गांधी, सुहास जाधव, तेजस धडाम, विपीन परमार, अनिल पोतदार, विजयकुमार भोसले, बाबा महाडिक, जितेंद्र राठोड, नंदकुमार ओसवाल, महेंद्र ओसवाल या सतरा उमेदवारांनी निवडणूक लढविली. मुख्य अधिकारी कांतिलाल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखालील जवाहर गांधी, विजय वशीकर आणि विजय मालणकर यांच्या समितीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली. उद्या सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. आधी १२ संचालकांच्या निवडी जाहीर होतील. त्यानंतर उपाध्यक्ष आणि सर्वांत शेवटी अध्यक्षपदाचा निकाल लागेल. ही सर्व प्रक्रिया संपायला दुपारचे दोन अडीच वाजतील, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)परिसरात गर्दी... चर्चेत ऊतमहाद्वार रोड, गुजरीत एरव्ही ग्राहकांची मोठी गर्दी असते. आज मात्र हा परिसर सराफ व्यावसायिकांनी गजबजला होता. संघाच्या दारात उमेदवारांसह त्यांचे समर्थक मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. मतदान केलेले आणि न केलेले सभासद गुजरी परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या काय निकाल लागेल, कोण निवडून येईल, या चर्चेचा फडच येथेच रंगला होता. मतदारांना साद...निवडणुकीच्या रिंग्ांणात असलेल्या उमेदवारांनी उमेदवारी नाव लिहिलेले बिल्ले लावले होते. मतदानासाठी आलेल्या सभासदाला संघाच्या दारातच गाठून आपल्या नावाची स्लिप आणि नंबर देत मलाच मतदान करा, असे सांगत होते. सभासद मात्र सगळ्यांनाच ‘हो-हो’ म्हणत आत जात होते. बाहेर आल्यानंतर मात्र सगळेच गप्पांत रंगल्याचे खेळीमेळीचे चित्र होते.