शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी इर्षेने ८५ टक्के मतदान

By admin | Updated: July 26, 2015 00:41 IST

अनेक गावांत खडाजंगी, बाचाबाचीचे प्रकार

७७९० उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद ;उद्या गुलाल कोल्हापूर : जिल्ह्यातील ३७० ग्रामपंचायतींसाठी शनिवारी तणावाच्या वातावरणात इर्षेने ८५.१८ टक्के, तर ४० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत ८५.६४ टक्के मतदान झाले. सकाळी साडेसातपासूनच मतदानासाठी केंद्रांवर रांगा लागल्याने सकाळी अकरापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक मतदान झाले. अनेक ठिकाणी बोगस मतासह मतदान करण्यावरून खडाजंगी व बाचाबाचीचे प्रकार घडले. ३९६३ जागांसाठी रिंगणात असलेल्या ७७९० उमेदवारांचे भवितव्य मतदान मशीनमध्ये बंद झाले. मतमोजणी उद्या, सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. साधारणत: दुपारी दोनपर्यंत संपूर्ण निकाल लागेल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात जिल्'ातील ४१६ ग्रामपंचायतींचे निवडणूक कार्यक्रम लागले होते. त्यापैकी ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. १ हजार ५०७ प्रभागात ३ हजार ९६३ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. ४७ संवेदनशील गावांत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पक्षापेक्षा स्थानिक सोयीनुसार आघाड्यांमध्ये लढती झाल्या. विधानसभा निवडणुकीत एकत्र असणाऱ्यांनीच एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. काही ठिकाणी मतदानाची वेळ सुरू होण्यापूर्वी मतदारांनी केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा लावल्या. यावरून निवडणुकीतील चुरस स्पष्ट होते. दुपारी दीडपर्यंत जिल्'ात सरासरी ६२.१८ टक्के मतदान झाले होते. दुपारच्या सत्रात मतदानाचा काहीसा वेग मंदावला. दुपारी साडेतीन वाजता सरासरी ७५.६५ टक्केमतदान झाले होते. दुपारी चारनंतर मतदारयाद्या चाळून मतदान न झालेल्यांचा शोध सुरू झाला. शेवटपर्यंत जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये ईर्षा लागली होती. सर्वच ठिकाणी काटा लढत असल्याने मतदारांना खूश करण्याची एकही संधी उमेदवारांनी सोडली नाही. अनेक गावांत ‘अंगठी’ चिन्ह असलेल्या उमेदवारांनी थेट सोन्याच्या अंगठ्यांचे वाटप केले. पैसा, दारू, मटणाचा तर अक्षरश: महापूरच आला होता. अनेक ठिकाणी पाच किलो साखर, गुळाचे रवे देऊन मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांना प्रलोभने दिली जात असताना जिल्हा प्रशासनाचा कोठेही अंंकुश दिसला नाही. दृष्टिक्षेपात निवडणूक - निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत-४१६ बिनविरोध - ४६ प्रत्यक्ष निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती- ३७० मतदार- ८ लाख ६४ हजार प्रभाग- १५०७ जागा- ३९६३ उमेदवार- ७७९०