कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक किती चुरशीची असेल याची चुणूक मंगळवारी नामनिर्देशनपत्रे भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिसून आली. सर्वच उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी सवाद्य मिरवणुकीने जाऊन आपले नामनिर्देशपत्रे भरण्यावर जोर दिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये असलेले परिसर गर्दीने फुलून गेले. पक्षीय उमेदवारी नाकारल्याने विविध पक्षांत नाराजी, बंडखोरीचे नाट्यदेखील कमालीचे रंगले.उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अखेरच्या मंगळवारी एकाच दिवशी ६१३ उमेदवारांनी त्यांची नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केली. त्यामुळे आतापर्यंत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या ८१८ वर पोहोचली आहे. मोठ्या संख्येने नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्याने ती दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
माजी महापौरही पुन्हा रिंगणात..माजी महापौर हसीना फरास, स्वाती यवलुजे, माधवी गवंडी यांनी पुन्हा एकदा महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. तर माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती आश्कीन आजरेकर, वंदना बुचडे यांचे पती सुभाष बुचडे, प्रतिभा नाईकनवरे यांचे पती प्रकाश नाईकनवरे, शोभा बोंद्रे यांचे पुत्र इंद्रजित बोंद्रे व सून मयूरी बोंद्रे निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
अरे बापरे.. ४२ माजी नगरसेवक मैदानात..माजी उपमहापौर भूपाल शेटे, संजय मोहिते, प्रकाश पाटील, अर्जुन माने यांच्यासह ४२ माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये महायुतीकडून २२, तर काँग्रेसकडून २० माजी नगरसेवक निवडणूक लढविणार आहेत. काही माजी नगरसेवकांनी त्यांची पत्नी, पुत्र, पती असलेल्या २१ जणांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. माजी नगरसेवक राहुल माने व त्यांच्या पत्नी ऋग्वेदा माने दोघेही निवडणूक लढवीत आहेत. राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, तसेच आमदारपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनाही त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे.
भाजप-शिंदेसेनेमध्ये बंडखोरीचा उद्रेक..भाजप, शिंदेसेना या पक्षांत उमेदवारी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. इतकी वर्षे पक्षाशी बांधील राहून देखील उमेदवारी न मिळाल्यामुळे काहींनी थेट बंडखोरी करून नामनिर्देशनपत्रे भरली आहेत. काँग्रेसमध्येही एक-दोन ठिकाणी बंडखोरी झाली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी याद्या उशिरा जाहीर करूनही उमेदवारांनी पुढे काय करायचे हे ठरवून ठेवले होते. आता हे बंडखोर माघार घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘एबी’ फॉर्म काही तास आधी हातीभाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातर्फे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या आधी काही तास पक्षाने ‘एबी’ फॉर्मचे वाटप केले. त्यामुळे उमेदवारांची सोमवारची रात्र अतिशय तणावात गेली. ‘एबी’ फॉर्म हाती पडताच हा तणाव क्षणात निवळला.
Web Summary : Kolhapur's municipal election is heating up with 818 nominations filed amid party infighting. Former mayors and relatives of politicians are contesting. Rebellion is brewing in BJP and Shinde Sena over ticket distribution. Parties distributed 'AB' forms late, causing tension.
Web Summary : कोल्हापुर नगर निगम चुनाव में पार्टी में अंदरूनी कलह के बीच 818 नामांकन दाखिल किए गए हैं। पूर्व महापौर और राजनेताओं के रिश्तेदार चुनाव लड़ रहे हैं। टिकट वितरण को लेकर बीजेपी और शिंदे सेना में विद्रोह हो रहा है। पार्टियों ने देर से 'एबी' फॉर्म वितरित किए, जिससे तनाव हुआ।