शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

शिरोळ पालिकेसाठी चुरशीने ८० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 1:15 AM

शिरोळ : शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी चुरशीने ७९.९१ टक्के मतदान झाले़ २१७३१ मतदारांपैकी १७३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला़ किरकोळ शाब्दिक ...

शिरोळ : शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी चुरशीने ७९.९१ टक्के मतदान झाले़ २१७३१ मतदारांपैकी १७३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला़ किरकोळ शाब्दिक बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली़ कोणताही अनुचित प्रकार घडला नाही़ एकूण नगरसेवक पदाच्या १७ जागेसाठी ८३ उमेदवारांचे, तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले़ आज, सोमवारी मतमोजणी होणार असून, निकालानंतर शिरोळची सत्ता कुणाकडे हे स्पष्ट होणार आहे़ पालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने नगरसेवक पदापेक्षा नगराध्यक्ष पदाच्या निकालाकडे उत्सुकता लागून राहिली आहे.‘गोकुळ’चे संचालक अनिल यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजप, खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व काँग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी, आमदार उल्हास पाटील, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी आणि प्रमोद लडगे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीत चौरंगी लढत झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पाशा पटेल, शिवसेनेचे लक्ष्मण वडले या दिग्गजांच्या प्रचारातील सहभागामुळे निवडणुकीत रंगत आली.येथील पालिकेच्या नगरसेवक पदाच्या १७, तर नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी रविवारी सकाळी साडेसात वाजता ३० मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळी नऊनंतर मतदानाला वेग आला. अनेकांनी सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रात मतदान केले. मतदानाच्या अखेरच्या दीड तासात मतदानाला मतदारांनी गर्दी केली होती़ प्रभाग आठ व तीनमध्ये मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड वगळता मतदान शांततेत पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, प्रशासक तथा तहसीलदार गजानन गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.साडेअकरा वाजेपर्यंत फटाके फुटणार...मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात आज, सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. आठ टेबलांवर मतमोजणी होणार आहे़ एकाचवेळी आठ प्रभागांतील मतमोजणाी होणार असून, नगराध्यक्ष पदाचा निकाल शेवटी जाहीर होणार आहे. त्यामुळे सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहे.मताचा टक्का कोणाच्या पथ्यावरशिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी चौरंगी सामना झाल्यामुळे ८० टक्क्यांपर्यंत मतदान झाले. भाजपसह अन्य तीन आघाड्यांनी विजयाचा दावा केला आहे. चुरशीने ८० टक्के मतदान झाले असले तरी वाढलेला मताचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे आज, सोमवारी सकाळी स्पष्ट होणार आहे.नगराध्यक्ष पदाचा गुलाल कोणालाशिरोळ पालिकेची निवडणूक नगरसेवक पदापेक्षा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरून गाजली. भाजप, शाहू, ताराराणी व बहुजन आघाडीच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाची ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. प्रचार काळात अनेक आरोप-प्रत्यारोपाचे मुद्दे गाजले. यामुळे नगराध्यक्ष पदाचा दावेदार कोण ठरणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.