शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ७९ जणांना मोफत प्रवेश

By admin | Updated: July 28, 2015 23:33 IST

‘आरटीई’नुसार २५ टक्के आरक्षण : खासगी शिक्षण संस्थांचा २५ टक्के प्रवेशास ठेंगा; प्रशासन बघ्याच्या भूमिकेत

भीमगोंडा देसाई-कोल्हापूर --शहरातील बालवाडी, पहिली यासाठी गरीब, सर्वसामान्य, मागासवर्गीय या घटकांतील विद्यार्थ्यांना ‘बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित ८१९ जागांच्या क्षमतेपैकी फक्त ७९, तर शहराबाहेरील अन्य तालुक्यांत ३ हजार ९४० पैकी २३९३ प्रवेश झाले आहेत. शहरात क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने कमी प्रवेश मिळाले तरी महानगरपालिका शिक्षण प्रशासन ‘बघ्याच्या भूमिकेत’ आहे. परिणामी हक्क असतानाही गरीब मुले मोफत प्रवेशापासून वंचित राहिली आहेत. शहराबाहेरील जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतही पन्नास टक्केच जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यावरून अजूनही मोफत प्रवेश देण्याची शिक्षण संस्थांची उदासीनता समोर येत आहे.शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार २४ मे २०१२ पासून राज्यात खासगी, विनाअनुदानित, अनुदानित, कायमस्वरूपी विनाअनुदानानित शाळांच्या कामकाजाची अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्यानुसार जिल्ह्यातील सर्व खासगी प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येक वर्षी २५ टक्के प्रवेश अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, धार्मिक अल्पसंख्याक व एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. कायद्यानुसार प्रवेश न देणाऱ्या संस्थांवर फौजदारी कारवाईची तरतूद आहे.२५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिलेल्या प्रति विद्यार्थ्यास २०१२-१३ वर्षात अधिकाधिक १२ हजार, २०१३-१४ वर्षांसाठी १४ हजार आणि २०१४-१५ साठी १७ हजार २६० रुपये शासनाने फीचे पैसे दिले आहेत. मात्र, या शासनाच्या फीपेक्षा कितीतरी अधिकपटीने फी आणि डोनेशन घेऊन बालवाडी आणि पहिलीला इंग्रजी माध्यमांच्या शाळा प्रवेश देत असतात, हे जगजाहीर आहे. अशा संस्थांना राजकीय वरद हस्तही असतो. कारवाईचा बडगा उगारला तर वरदहस्त असलेल्या संस्थाचालकांवर नगरसेवकांपासून आमदारांपर्यंतचा दबाव असतो म्हणूनच ते २५ टक्के कोट्यातून गरीब मुलांना विविध तांत्रिक कारणे सांगून प्रवेश देत नाहीत. २५ टक्केची अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षणसंस्थांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची पहिली जबाबदारी शिक्षण प्रशासनाची आहे. मात्र, शिक्षण प्रशासन निष्क्रिय झाल्यामुळेच खासगी शिक्षण संस्थाचालक मुजोर होऊन क्षमतेपक्षा कमी प्रवेश दिले आहेत. आरटीईतील २५ टक्के जागा प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली. प्रवेश नाकारणाऱ्या संस्थेविरुद्ध एकही तक्रार आलेली नाही. अजूनही त्यातून प्रवेश देण्यासाठी मुदत वाढविली आहे. तक्रार नसल्यामुळे कारवाई झालेली नाही.- प्रतिभा सुर्वे, शिक्षण प्रशासन अधिकारी, महानगरपालिका