धूमस्टाईलस्वारांकडून ७५ हजारांचा दंड

By Admin | Updated: September 6, 2015 22:39 IST2015-09-06T22:39:32+5:302015-09-06T22:39:32+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे.

75000 penalty from Dhumashtail swords | धूमस्टाईलस्वारांकडून ७५ हजारांचा दंड

धूमस्टाईलस्वारांकडून ७५ हजारांचा दंड

खेड : खेड शहर आणि परिसरातील अवैध आणि धूमस्टाईल वाहतुकीला लगाम घालण्याच्या हेतूने खेड पोलिसांनी सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे़ येथील वाहतूक पोलीस विभागाने धूमस्टाईल वाहने चालविणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या महिनाभरात त्यांच्याकडून तब्बल ७५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. विनापरवाना आणि धूमस्टाईल वाहने चालवणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. विशेषत: शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे अनेकवेळा लहानमोठे अपघात घडतात. हीच नाडी पकडून वाहतूक पोलिसांनी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, हवालदार ए. एस. पवार, एस. पी. निकम, एस. टी. मोहिते, एस. के. मोहिते, ए. एन. घाणेकर आणि महिला पोलीस कर्मचारी ए. एस. साळवी आदींनी ही कारवाई अधिक व्यापक केली़ महिनाभरात ७५ हजार रूपयांचा दंड वसूल केला़ या कारवाईने अनेक धूमस्टाईलस्वारांचे चांगलेच बारा वाजले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: 75000 penalty from Dhumashtail swords