शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

आजरा संघासाठी ७४.६६ टक्के मतदान

By admin | Updated: July 27, 2015 00:27 IST

आज मतमोजणी : ४२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; दोन्ही आघाडीकडून विजयाचा दावा

आजरा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आजरा तालुका शेतकरी सहकारी संघाकरिता ७४.^^६६ टक्के इतके सरासरी मतदान झाले असून, विकास सेवा संस्था गटात व इतर संस्था गटात शंभर टक्के इतके मतदान झाले. मतदान कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.पावसाने दिवसभर दिलेली उघडीप व निवडणुकीबाबत सभासदांना असणारी उत्सुकता यामुळे सकाळपासूनच मतदारांनी ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. मतदारांना आणण्यासाठी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आली होती. मतदारांच्या चहापानाची व्यवस्थाही ठेवण्यात आली होती.सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विकास सेवा संस्था गटातील राजर्षी शाहू विकास आघाडीने आपले समर्थक मतदार आणले, तर पावणेदहा वाजता रवळनाथ विकास आघाडीचे समर्थक मतदार आणण्यात आले.यावेळी शाहू आघाडीचे नेते श्रीपतराव देसाई, अशोक चराटी, आघाडीचे प्रमुख श्रीपतराव देसाई, नामदेव नार्वेकर उपस्थित होते. रवळनाथ विकास आघाडीचे सुधीर देसाई, जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई, उदय पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)सकाळी आठपासून मोजणीअण्णा-भाऊ सभागृहामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. एकूण ३० टेबलांवर ही मतमोजणी करण्यात येणार असून, सर्वप्रथम विकास सेवा संस्था गट, त्यानंतर इतर संस्था गट व शेवटी व्यक्ती सभासद गटाची मतमोजणी होणार आहे. फेटेच फेटे...फटाकेच फटाकेविकास सेवा संस्था गटातील मतदारांना आणताना रवळनाथ विकास आघाडीने पांढरे, तर शाहू विकास आघाडीने भगव्या रंगाचे फेटे बांधून मतदारांना आणले. सेवा संस्था गटातील मतदानानंतर दोन्ही पॅनेलच्या समर्थकांकडून जोरदार आतषबाजी करण्यात आली. यामुळे गोंधळात भर पडत होती.चर्चा फुटीचीसेवा संस्था गटातून आणलेल्या एकमेकांच्या विरोधी मतदारांतील काही मतदार फोडल्याचा दावा दोन्ही गट करीत होते. नेमके काय घडले हे आज, सोमवारी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.