भरदिवसा हॉकी स्टेडियमनजीक ६० हजारांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 19:13 IST2021-02-16T19:11:29+5:302021-02-16T19:13:10+5:30
Crime News police Kolhapur- भरदिवसा चोरट्याने बंद फ्लॅट फोडून दीड तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना धान्यचंद हॉकी स्टेडियमजवळील विंग शारदा विहारमध्ये घडली. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

भरदिवसा हॉकी स्टेडियमनजीक ६० हजारांची घरफोडी
कोल्हापूर : भरदिवसा चोरट्याने बंद फ्लॅट फोडून दीड तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना धान्यचंद हॉकी स्टेडियमजवळील विंग शारदा विहारमध्ये घडली. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हॉकी स्टेडियमसमोरील शारदा विहार अपार्टमेंटमधील परशराम साबू कल्लोळी हे सोमवारी दुपारी एक वाजण्याच्यासुमारास फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून जवाहरनगरात नातेवाईकांच्या लग्न कार्यासाठी गेले होते.
दरम्यान, चरोट्याने त्यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरूमधील ड्रेसिंग टेंबलमध्ये असणाऱ्या अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या रिंगा, अर्धा तोळ्याचे टॉप्स्, अर्धा तोळ्याचे लॉकेटसह दोन लहान अंगठ्या आणि चांदीची मूर्ती असा ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. कल्लोळी कुटुंबीय दुपारी दोन वाजता परतले असता चोरीचा प्रकार घडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.