शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

कोल्हापुरातील ६ हजार नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, जिल्हा प्रशासनाची पावणेचार कोटींची मागणी

By भीमगोंड देसाई | Updated: December 17, 2022 13:25 IST

जुलै, ऑगस्ट महिन्यातील नुकसानग्रस्तांना मदत

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे ५ हजार ८६२ शेतकऱ्यांचे १९२८ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३ कोटी ७६ लाख ९५ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. हा निधी मिळाल्यानंतर नव्या दरानुसार भरपाईची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. मात्र नुकसान होऊन दोन महिने झाले तरी भरपाईची रक्कम न मिळाल्याने संबंधित शेतकरी प्रतीक्षेतच आहेत.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महसूल विभागातर्फे भरपाई दिली जाते. यंदाच्या जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत जिरायत पिकांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी २७ हजार, फळबागांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी ३६ हजार रुपयांप्रमाणे भरपाई देण्यात आली आहे. जास्त पावसामुळे सप्टेंबरमध्ये पिकांचे नुकसान झालेले नाही. मात्र ऑक्टोबरमधील परतीच्या जोरदार पावसामुळे विविध पिकांना फटका बसला. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले.

सर्वाधिक शिरोळ तालुक्यातीलऑक्टोबरमधील पावसाने विविध पिकांचे झालेले नुकसानीचे क्षेत्र हेक्टरमध्ये आणि कंसात नुकसानभरपाईपोटी शासनाकडे मागणीचा निधी असा : करवीर : ५९.७७ (१२ लाख ५५ हजार), राधानगरी : ६.५२ (९१ हजार), पन्हाळा : १०६.९० (२२ लाख १० हजार), शाहूवाडी : १३ (१ लाख ७७ हजार), हातकणंगले : ४२७.८४ (६५ लाख ४७ हजार), शिरोळ : १३१३.६५ (२ कोटी ७४ लाख), भुदरगड : ०.४६ (८ हजार).

जुलै, ऑगस्ट महिन्यातील नुकसानग्रस्तांना मदतजुलै महिन्यात अतिवृष्टीने ३६२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यांना ९ लाख ९३ हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. ऑगस्टमधील अतिवृष्टीने २५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांना भरपाईपोटी ६० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

जास्त पावसाच्या तालुक्यात शून्य नुकसानगगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. पण ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसाने या तालुक्यात एकाही शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाकडे नाही. यासह चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचेही नुकसान झालेले नाही, असे शासनाच्या अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी