शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

जयंती नाला परिसरातून सहा डंपर कचरा जमा, महास्वच्छता अभियानास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:50 AM

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून राबविलेल्या महास्वच्छता मोहिमेत सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. मोहिमेच्या नवव्या रविवारी लक्ष्मीपुरी ते सिद्धार्थनगर या दरम्यान जयंती नाला परिसरात हे महास्वच्छता अभियान राबविले, यामध्ये सुमारे सहा डंपर कचरा गोळा करण्यात आला. रंकाळा तलाव पूर्व व पश्चिम बाजूचीही यावेळी स्वच्छता करण्यात आली.

ठळक मुद्देजयंती नाला परिसरातून सहा डंपर कचरा जमा, महास्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसादरंकाळा तलाव पूर्व, पश्चिम बाजूचीही स्वच्छता

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून राबविलेल्या महास्वच्छता मोहिमेत सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. मोहिमेच्या नवव्या रविवारी लक्ष्मीपुरी ते सिद्धार्थनगर या दरम्यान जयंती नाला परिसरात हे महास्वच्छता अभियान राबविले, यामध्ये सुमारे सहा डंपर कचरा गोळा करण्यात आला. रंकाळा तलाव पूर्व व पश्चिम बाजूचीही यावेळी स्वच्छता करण्यात आली.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी या महास्वच्छता अभियानावर नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले.सकाळी लक्ष्मीपुरी येथील कोरे हॉस्पिटलच्या पिछाडीस असलेल्या जयंती नाल्यामध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला, तर शाहूपुरी कुंभार गल्लीतील जयंती नाल्यातील गाळ जेसीबी मशीनद्वारे बाहेर काढण्यात आला.यावेळी पुणे उपजिल्हाधिकारी अशोक पाटील, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहा. आयुक्त संजय सरनाईक, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, नारायण भोसले, आर. के. पाटील, परवाना अधीक्षक राम काटकर, दिलीप देसाई, कॉ. दिलीप पोवार, कोल्हापूर क्रिडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, महापालिकेच्या सर्व विभागाकडील कर्मचारी, आरोग्य विभागाकडील ३०० कर्मचारी, अधिकारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.नाल्यातील या मार्गावरील हटविला कचरामहापालिकेच्या वतीने लक्ष्मीपुरीतील विल्सन पूल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल पिछाडीस ते रिलायन्स मॉल पिछाडीस, सिद्धिविनायक गणपती मंदिर पुलाची खालची बाजू, लक्ष्मीपुरी ते आयर्विन ब्रिज, टायटन शोरूमलगत दफनभूमी, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, संप आणि पंप हाऊस ते सिद्धार्थनगर या जयंती नाला परिसरातील कचरा हटविला, तर रंकाळा तलाव पूर्व व पश्चिम बाजंूची स्वच्छता करण्यात आली.लहान मुलांचा सक्रिय सहभागदसरा चौक येथील मैदानाची वृक्षप्रेमी ग्रुपच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. यावेळी लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या मोहिमेसाठी कोल्हापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सर्वांना हँडग्लोज पुरविण्यात आले.हिरवा, पिवळा गणवेशस्वच्छता मोहिमेत वृक्षप्रेमी ग्रुपच्या वतीने पिवळा टि शर्ट घालून मुलांनी व युवकांनी सहभाग घेतला, तर ‘अवनि’ संस्थेच्या महिलांनी हिरव्या साड्या परिधान करून स्वच्छता मोहिमेला हातभार लावला.संस्थांचा सहभागमोहिमेत असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट, क्रिडाई कोल्हापूर, वृक्षप्रेमी ग्रुप, प्रजासत्ताक संस्था यांच्यासह ‘अवनि’, ‘एकटी’, ‘भावना रात्रनिवारा’ या संस्थेच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर